सोलापूर लोकसभेतील महायुतीचे उमेदवार राम सातपुते आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदेंच्या 'राजकीय पत्राची' चांगलीच चर्चा झाली. प्रणिती शिंदेनी पत्र लिहीत राम सातपुते यांना उपरोधिक टोला लगवला तर राम सातपुते यांनी ही सडेतोड उत्तरं पत्राच्या माध्यमातून दिले.
अशातच आता 'एक तरुण बेरोजगार' म्हणून भाजपचे राम सातपुते आणि प्रणिती शिंदे या दोन्ही उमेदवारांना सोलापुरच्या तरुणाने पाठवलेले पत्र आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. (Maharashtra Loksabha Election 2024)
"कू. प्रणिती ताई यांचे पत्र पाहिले, अत्यत कमी शब्दामध्ये संस्कार आणि संस्कृतीचे दर्शन तुम्ही सोलापूरकरांना सोलापूरकरांना करवून दिलात, त्याला प्रतिउत्तर देत रामभाऊनेही अत्यंत गंभीर आणि खोचक व शिस्तबद्ध उत्तर दिलेले दिसत आहे. दोघांनीही स्वतःचे संस्कार जपत शिस्तीचे प्रदर्शन करीत उत्तरांची सौम्य आगपाखड केली आहे, तो तुमच्या राजकारणाचा भाग झाला..!
परंतु माझ्या सारख्या युवकास आज ही या प्रश्नांची उकल नाही झाली की, मला सोलापूर सोडून का जावं लागतं.? मला शिक्षण तर भेटते पण नोकरी का नाही.? मला टॅक्स नोटीस तर वेळेवर भेटते पण पाणी का नाही.! तुम्ही दोघेही तरुण आमदार आहात, उच्चशिक्षित आहात, तरी माझ्यासारख्या तरुणास कधी जातीच्या नावे लढावे लागते, तर कधी एकत्र यावे लागते, परंतु आम्हाला कधीच तुम्ही शिक्षणाच्या नावे एकत्र करण्याच्या प्रयत्न केलाच नाही. कारण तुम्ही सत्तेचा सारीपाट वाटून घेतलाय.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दोघांनीही पाच वर्षे विधानसभेचे नेतृत्व केलं पण आमच्या सारख्या तरुणांना फक्त रोजगार आणि उद्योगांच्या नावे आश्वासनांवर झुलवत ठेवलं असो, तरी तुम्हा दोघांचेही स्वागत आणि अभिंनदन..! कारण तुम्हा दोघांतील एक जण राजकीय वारश्याने तर एकजण राजकीय वरदहस्ताने ह्या लोकसभेसाठी उभे आहात..!
परंतु कोणीही जनसामान्यातून नाही, तुम्ही दोघेही आपापल्या पक्षाचे प्रतिनिधित्व करत आहात., परंतु लोकांचे नाही..! असो, कुणी ऊसतोड कामगाराचा दलिताचा मुलगा म्हणून पंचतारांकित हॉटेलात आरोळी न फोडता, मी एक नारी म्हणून मुंबईतील घरामध्ये परंपारिक मतदारांची थट्टा नाही करणार एवढच आश्वासन गरजेचे आहे..!" असे या पत्रामध्ये म्हटले आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.