Maharashtra Politics 2024 : संजय निरुपम, रविंद्र वायकरांना मनसे पाठिंबा देणार का? ; शालिनी ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं

Lok Sabha Election 2024 : मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका केली आहे. राज ठाकरे यांनी केवळ नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे संजय निरुपम आणि रविंद्र वायकर यांना मनसेचा पाठिंबा गृहीत धरू नये, असं म्हटलं आहे.
Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024Saam Digital
Published On

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका लवकरच पार पडणार आहेत. मात्र अद्यापही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र ज्या उमेदवारांची महायुतीकडून उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघासाठी चर्चा सुरू आहे, अशा दोन्ही उमेदवारांना भाजप आणि मनसेकडून प्रचंड विरोध केला जात आहे. अशातच मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी या उमेदवारांना विरोध करणारी पोस्ट एक्सवर प्रसिद्ध केली आहे.

मनसेला 'धनुष्य बाण' चिन्हावर लढायला सांगणार्‍यावर दुसर्‍या पक्षातून उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे. लक्षात ठेवा राज ठाकरे यांनी फक्त देशाला सक्षम नेतृत्व मिळावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा दिला आहे. इकडून तिकडून आलेले संजय निरुपम आणि भ्रष्टाचारी रविंद्र वायकरांसारख्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र सैनिकांचा पाठींबा गृहीत धरू नये.

संजय निरुपम ज्यांची त्यांच्याच पक्षातून हकालपट्टी झाली. भाजपचे सुद्धा काही नेते म्हणाले की इतर पक्षातील कचरा घेऊ नका. अशा माणसांना आपण खासदारकीचे उमेदवारी देणार आहोत का आणि पक्षात घेणार आहोत का? आणि दुसऱ्या बाजूला रवींद्र वायकर यांना त्यांच्याच जोगेश्वरी विधानसभेमध्ये विरोध आहे. मग ते उत्तर पश्चिमचे उमेदवार कसे होतील? या दोन्ही उमेदवारांच्या चर्चेमुळे मनसैनिकांची जी भावना आहे ती मी व्यक्त केली आहे.

Maharashtra Politics 2024
Shrirang Barne Wealth : दागिने, स्थावर मालमत्ता, वाहने आणि बरंच काही; १० वी उत्तीर्ण श्रीरंग बारणेंची एकूण संपत्ती किती?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनिश्वर्त पाठिंबा दिला आहे आणि आम्ही सर्व मनसेचे कार्यकर्ते त्यांच्या आदेशाचे पालन करणार आहेत. अजूनही महायुतीचे उमेदवार द्यायचे आहेत. जी दोन नावे चर्चेत आहेत त्यांना मोठा विरोध असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Maharashtra Politics 2024
Sujat Ambedkar: काँग्रेस हीच भाजपची बी टीम : सुजात आंबेडकर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com