Maharashtra Election:..मग मला बिनविरोध निवडून द्यावं; ठाण्याच्या उमेदवारीवरुन राजन विचारे यांचा महायुतीला टोला

Rajan Vichare: ठाणे मतदारसंघावरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. या तिढ्यावरून ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी महायुतीला टोला मारलाय.
Rajan Vichare Slams Mahayuti
Rajan Vichare

Rajan Vichare Slams Mahayuti :

महायुतीमध्ये लोकसभा जागावाटपावरून रस्सीखेच सुरूय. जवळपास १० जांगावर ही रस्सीखेच सुरू होती. आता हा तिढा फक्त दोन ते तीन जागांवर राहिलाय, त्यातील एक जागा म्हणजे ठाणे. या मतदारसंघाच्या रस्सीखेचवरुन ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी महायुतीला टोला मारलाय.(Latest News)

ठाणे आम्हालाच हवे, असा प्रचंड आग्रह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धरलाय. शिंदे सेनेकडे कोकणात कल्याण, पालघरबरोबर ठाणे राहू शकते. ठाण्यासाठी शिंदेंनी सुचविलेले उमेदवारांचे पर्याय भाजपला मान्य नाहीत. शिंदे यांनी प्रताप सरनाईक यांना लढविल्यास भाजप राजी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सरनाईक तेवढे इच्छुक नाहीत. त्यावर भाजपचे संजीव नाईक यांनी शिंदेसेनेकडून लढावे, असा प्रस्तावही विचाराधीन असल्याचं सांगितलं जात आहे. यासर्व प्रकरणावरून ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी महायुतीला टोला मारलाय. मिंधे गटात अलबेल नसून त्यांच्यात नाराजीचा सूर असल्याचं ते म्हणालेत. कल्याण मतदारसंघाच्या उमेदवारीवरून विचारे यांनी श्रीकांत शिंदे यांना डिवचलं. . (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

खऱ्या अर्थाने आज श्रीकांत शिंदे यांच्या नावाची देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली. यामुळे मिंदे गटाचा उमेदवार जाहीर करायला देवेंद्र फडणवीस गेले यातूनच काय सुरू आहे ते समजून घ्यावे. कल्याण मतदारसंघाच्या तयारीविषयी बोलताना ते म्हणाले की, येथे आम्ही अगोदरपासून त्यांनी काम सुरू केले आहे.

एक सक्षम महिला शक्ती या ठिकाणी उभी राहत आहे, त्याचे परिणाम दिसून येतील. कल्याणच्या उमेदवार वैशाली दरेकर या जितेंद्र आव्हाडांना भेटायला आल्या होत्या. आज खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रचाराची सुरुवात झाल्याचं विचारे म्हणाले. यानंतर राजन विचारे यांनी ठाणे मतदारसंघावरून महायुतीला टोमणा मारला. ठाण्याचा उमेदवार मिळत नसेल तर महायुतीने मला बिनविरोध निवडून द्या, अशी मिष्किल टोला त्यांनी लगावलाय. ठाण्यातील प्रचाराची एक फेरी पूर्ण झाल्याचंही ते म्हणाले.

Rajan Vichare Slams Mahayuti
Maharashtra Election: हिंगोलीत महायुतीला तडा जाण्याची शक्यता; भाजप-शिवसेना आमनेसामने

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com