Dindori Loksabha Election: दिवस मावळला तरी मतदार येईना; एकही मत न देणारं मेव्हणं गाव आलं चर्चेत

Mevhane Village People Boycott Voting : दिंडोरी मतदारसंघात येणाऱ्या मेव्हणे गावातील लोकांना लोकसभेच्या मतदानाकडे पाठ फिरवलीय. लोकप्रतिनिधी त्यांच्या समस्यांकडे लक्ष देत नसल्याने गावकऱ्यांनी आता मतदानावर बहिष्कार टाकला. गावकऱ्याच्या या निर्णयाने या गावाची चर्चा अख्या राज्यभरात होत आहे.
Dindori Loksabha Election: दिवस मावळला तरी मतदार येईना; एकही मत न देणारं मेव्हणं गाव आलं चर्चेत
Mevhane Village People Boycott Voting saam

नाशिक: वर्षानुवर्षे पाणी समस्या, गावातील इतर नागरी सुविधा, न देणाऱ्या पुढाऱ्यांना गावकऱ्यांनी इंगा दाखवला. वारंवार मागणी करूनही गावकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या लोकप्रतिनिधींना 'गावकरी ते राव काय करी' या म्हणीचा प्रत्यय आला. गावकऱ्यांच्या मतदानावरील बहिष्कारामुळे मेव्हणे हे गाव चर्चेत आलंय.

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघातील मेव्हणे येथे मतदान करण्याची वेळ संपली तरीही एकाही व्यक्तीने मतदान केलं नाही. मेव्हणे गावातील मतदान केंद्रावर कुठल्याच उमेदवारांच्या नावाने मतदान झालं नाही. लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर गावकऱ्यांनी बहिष्कार टाकण्यामागचं कारण म्हणजे येथील आजतागायत काय असलेल्या समस्यांचं निराकरण न होण. वर्षानुवर्षे पाणी समस्या, गावातील इतर नागरी सुविधा, अवकाळी नुकसानीचे अनुदान न मिळणे अशा विविध समस्यांमुळे येथील ग्रामस्थ त्रस्त झाले होते. त्यामुळे येथील गावकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला.

दरम्यान आज लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पाचवा टप्पा होता. राज्यातील मतदानाचा हा अखेरचा टप्पा होता. देशातील ८ राज्यात लोकसभेसाठी मतदान झालं. इतर राज्यात झालेल्या मतदानाच्या टक्केवारीच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान झालं. मतदानाच्या या पाचव्या टप्प्यात १३ मतदारसंघात मतदान झालं.आज संध्याकाळपर्यंत ४८.६६ टक्के मतदानाची नोंद झाली. कल्याण लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे ४१.७० टक्के मतदान झालं तर दिंडोरीत सर्वाधिक ५७.०६ टक्के मतदान झालं. दिंडोरी मतदारसंघातील मेव्हणे गावात मतदान पार पडलं असतं तर ही टक्केवारी अजून वाढली असती.

दरम्यान आज ७ वाजेपासून सकाळी मतदानाची सुरुवात झाली. परंतु मेव्हणे गावातील लोकांनी पूर्ण शंकर टक्के बहिष्कार घातल्याने दुपारपर्यंत एकही मतदार मतदान केंद्राकडे फिरकला नव्हता. मतदार मतदान केंद्राकडे फिरकत नसल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना मिळाली, त्यानंतर मालेगावचे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची भेट घेतली, मात्र त्याच्या भेटीचा गावकऱ्यावर काहीच परिणाम झाला नाही. संध्याकाळपर्यंत गावातील एकाही व्यक्तीने मतदान न केल्याने दिंडोरी मतदारसंघातील मेव्हणे ही गाव सोशल मीडियात चर्चेत आलंय.

Dindori Loksabha Election: दिवस मावळला तरी मतदार येईना; एकही मत न देणारं मेव्हणं गाव आलं चर्चेत
Lok Sabha Election 2024 : राज्यात सर्वात कमी ४८.६६ टक्के मतदान तर या राज्यात झालं उच्चांकी मतदान; 7 वाजल्यानंतरही मतदान सुरू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com