Tejas Thackeray: बाळासाहेबांच्या नातवाची राजकारणात एन्ट्री?, तेजस ठाकरे घेतायेत राजकारणाचं बाळकडू

Maharashtra Loksabha Election 2024: बाळासाहेब ठाकरेंच्या याच शब्दांची प्रचिती वारंवार येतेय. कारण बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणेच ठाकरे घराण्यातलं आणखी एक नेतृत्व उदयाला येतंय. बाळासाहेबांचा नातू म्हणजेच उद्धव ठाकरेंचा दुसरा मुलगा तेजस ठाकरे राजकारणाचं बाळकडू घेतोय.
Maharashtra Loksabha Election 2024
Tejas Thackeray Saam Tv

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) प्रचाराचा धडाका सुरु केलाय. मविआच्या उमेदवारांसाठी उद्धव ठाकरे राज्यभर सभा घेत आहेत. उद्धव ठाकरेंसोबत तेजस ठाकरेही (Tejas Thackeray) प्रचाराच्या रणधुमाळीत उतरलेत. ठाकरेंच्या प्रत्येक सभेला तेजस ठाकरे उपस्थित राहायत. दरम्यान शिवसेनेत तेजस पर्व लवकरच सुरु होणार आहे का पाहुयात या रिपोर्टमधून...

बाळासाहेब ठाकरेंच्या याच शब्दांची प्रचिती वारंवार येतेय. कारण बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणेच ठाकरे घराण्यातलं आणखी एक नेतृत्व उदयाला येतंय. बाळासाहेबांचा नातू म्हणजेच उद्धव ठाकरेंचा दुसरा मुलगा तेजस ठाकरे राजकारणाचं बाळकडू घेतोय. हल्ली उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक सभेला तेजस ठाकरे उपस्थित असतात. पण स्टेजवर.. किंवा नेत्यांच्या गराड्यात तेजस ठाकरे तुम्हाला शोधून सापडणार नाहीत. तेजस ठाकरे उभा असतो शिवसैनिकांमध्ये. कधी ठाकरेंच्या सावलीप्रमाणे. तर कधी आपल्याच नेत्यांच्या नावाने घोषणा देताना.

Maharashtra Loksabha Election 2024
PM Modi : आम्ही त्यांच्या शिव्याही खाऊ आणि देशसेवाही करू: पीएम मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

बाळासाहेबांच्या तुलनेत उद्धव आणि आदित्य ठाकरेंनी नेहमीच शांत आणि संयमी राजकारण केलं. मात्र बाळासाहेबांना तेजस ठाकरे आपल्यासारखाच वाटायचा. त्यांची शिवसेना. आदित्य ठाकरेंची युवासेना. तशी तेजसची तोडफोड सेना असल्याचंही बाळासाहेबांनी दसरा मेळाव्याच्या भाषणातून सांगितलं होतं.

तेजस आता उद्धव ठाकरेंच्या मुशीत तयार होतायेत. उद्धव ठाकरेंची भाषणं निरखून पाहतायेत. कार्यकर्त्यांशी जुळवून घेतायेत. शिवसेनेतील फुटीनंतर आदित्य ठाकरेंनी आक्रमकपणे शिवसेनेचा मोर्चा सांभाळलाय. तर तेजस ठाकरे उद्धव ठाकरेंच्या पाठीवरची ढाल बनले आहेत. उद्धव ठाकरेंच्या सावलीप्रमाणे तेजस ठाकरे वावरताना दिसतायेत. मात्र तेजस अजुनही सक्रीय राजकारणात उतरलेले नाहीत.

Maharashtra Loksabha Election 2024
Madha Lok Sabha: माढ्यात भाजपची ताकद वाढली, देवेंद्र फडणवीसांची नवी खेळी; उत्तम जानकरांना मोठा धक्का

वन्यजीव म्हणजे वाईल्ड लाईफ हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तेजस ठाकरे यांनी वन्य जीवांचा अभ्यास करताना खेकड्यांच्या अन्य प्रजाती शोधून काढल्या आहेत. सप्टेंबर 2020 मध्ये तेजस यांनी सापाच्या नव्या प्रजातीचा शोध लावला होता. या सापाच्या नव्या प्रजातीचं नाव ‘बोईगा ठाकरे’ असं ठेवण्यात आलं होतं. तेजस ठाकरे यांनी गेल्यावर्षी पालीच्या दुर्मिळ प्रजातीचा शोध लावला होता.

आता आवड सोडून तेजस ठाकरे सवडीनुसार राजकारणात सक्रीय झालेत. प्रचारसभा, मोर्चे, आंदोलनांमधील त्यांचा सहभाग प्रकर्षानं दिसून येतो. त्यामुळे त्यांच्या राजकीय एन्ट्रीचीही जोरदार चर्चा सुरू आहे. आता ठाकरेंचं तेजस पर्व नेमकं कधी सुरु होणार याकडे सर्वांच लक्ष लागलंय.

Maharashtra Loksabha Election 2024
Pune Loksabha: रविंद्र धंगेकरांसाठी काँग्रेसचे दिग्गज मैदानात; राहुल गांधी- प्रियांका गांधी पुण्यात रोड शो करणार!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com