Maharashtra Election: 'जे करत आहे संविधान बदलण्याची भाषा; त्यांचा वाजवून टाका ताशा', रामदास आठवले विरोधकांवर बरसले

Ramdas Athawale Criticized Congress: पियुष गोयल यांच्या प्रचारासाठी २४ एप्रिल रोजी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभेचे चारकोप येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आठवलेंनी विरोधकांवर कवितेच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.
Ramdas Athawale
Ramdas Athawale Saam Tv

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे (North Mumbai Lok Sabha Constituency) महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांनी प्रचाराचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण केला आहे. यावेळी पियुष गोयल यांच्या प्रचारासाठी काल केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभेचे चारकोप येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आठवलेंनी विरोधकांवर आपल्या कवितेच्या माध्यमातून निशाणा साधला (Ramdas Athawale Criticized Congress) आहे.

भाषणा करताना रामदास आठवले यांनी काँग्रेसवर टीका केली. 'जे करत आहे संविधान बदलण्याची भाषा; त्यांचा या निवडणुकीत वाजवून टाका ताशा' असं म्हणत त्यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला. शिवाय मंत्री असताना पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी दादर येथील इंदू मिलची जागा बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी दिली. यावरून देखील आठवले यांनी कविता करून सर्वांना खळखळून हसवले.

यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, 'इंदू मिलची जागा देण्यात पियुष गोयल (North Mumbai Lok Sabha Constituency Mahayuti Candidate) यांचा आहे फारच मोठा वाटा, काढून टाका इथे महाविकास आघाडीचा काटा' असे म्हणत आठवलेंनी विरोधकांवर निशाणा साधला. तसंच पियुष गोयल विजयी होणार आणि पुन्हा मंत्री देखील होणार असल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. पियुष गोयल यांच्या चारकोप येथील प्रचार सभेत आठवले विरोधकांवर बरसताना (Ramdas Athawale Criticized) दिसले आहेत.

Ramdas Athawale
Ramdas Athawale : मोदींना हरवणे येड्या गबाळ्याचे काम नाही; रामदास आठवलेंचा विरोधकांवर निशाणा

महायुतीचे पियुष गोयल यांच्या प्रचारासाठी २४ एप्रिल रोजी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभेचे चारकोप येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रामदास आठवलेंनी विरोधकांवर कवितेच्या माध्यमातून (Lok Sabha 2024) निशाणा साधत टिका केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी पियुष गोयल विजयी होणार आणि पुन्हा मंत्री देखील होणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. प्रचार सभेमध्ये विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप (Maharashtra Election) करताना दिसत आहेत. निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलंच तापलेलं दिसत आहे.

Ramdas Athawale
Ramdas Athawale यांची कार्यकर्त्यांनी साेडली साथ, राज्यात दहा ठिकाणी लढणार निवडणूक; काेल्हापुरातील उमेदवाराची घाेषणा (Video)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com