(गोपाल मोटाघरे, मावळ)
Rohit Pawar Slams Ajit Pawar And Parth Pawar : पिंपरी: श्रीरंग बारणेंनी पार्थ पवारांचा पराभव केला, त्याचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अजित पवार आलेत. पण आम्ही त्या पण आम्ही त्या पराभवाची आम्ही परतफेड करू. असं म्हणत रोहित पवार यांनी श्रीरंग बारणे यांचा पराभव करण्याचा विडा उचलाय.
मावळ लोकसभा मतदारसंघातील लढत इतर लढतीप्रमाणे रोचक होणारय. येथील लढत श्रीरंग बारणेविरुद्ध वाघोरे, अशी होता आता अजित पवारविरुद्ध रोहित पवार होता दिसत आहे. रोहित पवार नेहमीच आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मार्किक शब्दात टोमणा मारत असतात. अजित पवार गट जेव्हापासून भाजपसोबत गेलाय तेव्हापासून त्याच्या टीकेच्या लक्ष्यस्थानी अजित पवार आलेत. आता बारणेंच्या उमेदवारी अर्जावरूनही त्यांनी अजित पावर यांना लक्ष्य करत त्यांना टोमणा मारलाय.
बारणे हे आता मावळमधील महायुतीचे उमेदवार आहेत. दरम्यान बारणेंनी २०१९ मध्ये पार्थ पवार यांचा पराभव केला होता. आता त्याच बारणेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पार्थ पवार याचे वडील अजित पवार हे आले होते. ज्या उमेदवाराने पार्थचा पवार यांचा पराभव केला होता, त्यांचाच अर्ज भरण्यासाठी अजित पवार आल्याने रोहित पवारांनी टोला लगावलाय. पार्थ पवाराच्या पराभवाचा मुद्दा उपस्थित करत रोहित पवारांनी पार्थ पवारांना डिवचले आहे. रोहित पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील आपल्या भावाचा पराभवाचा बदला घेण्याची भाषा केलीय.
माझा भाऊ पार्थ पवारचा पराभव महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केला आहे. पण काल पार्थचे वडील अजित पवार स्वतः श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायला आले होते. आधी वडीलधाऱ्या शरद पवारांची साथ सोडली, आता पार्थचा पराभव करणाऱ्यांचा प्रचार वडील अजित दादा करताहेत. पार्थचा पराभव पचवून नव्हेतर अजित पवारांना स्वतःचं बरंच काही पचवायचं असल्याने ते श्रीरंग बारणे यांचा प्रचार करतायेत. पण, पार्थने चिंता करू नये. मी त्याचा भाऊ म्हणून त्याच्या पराभवाचा बदला घ्यायला मावळ लोकसभेत आलोय, अशी प्रतिज्ञाच रोहित पवार यांनी केली.
दरम्यान मावळमध्ये महाविकास आघाडीने ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांना उमेदवारी दिलंय. बारणेंनी पार्थ पवार यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. आता वाघेरे त्यांच्या वर्चस्वाला धक्का देणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.