सुशील थोरात, अहमदनगर
Chief Minister Eknath Shinde : अहमदनगर : राहुल गांधींना थोडी गर्मी झाली की ते परदेशात जातात. राहुल गांधींनी स्वप्नात विचार केला तरी ते पंतप्रधान होऊ शकत नाहीत, फक्त मोदीच पंतप्रधान होऊ शकतात. गेल्या ५० वर्षात राहुल गांधींचे लॉन्चिंग होऊ शकलं नसल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलीय. डॉ. सुजय विखे यांच्या समर्थनार्थ घेण्यात आलेल्या प्रचार सभेत मुख्यमंत्री बोलत होते.
राज्यातील (अहमदनगर) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नगरमधील निवडणुकीकडे अख्या देशाचं लक्ष लागलं आहे. महायुतीकडून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिलीय आज डॉ. सुजय विखे-पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी विखेंच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'इंडिया' आघाडी आणि राहुल गाधींवर हल्लाबोल चढवला.
मोदींच्या नखाची सर इंडिया आघाडीला येणार नसणार असल्याची टीका शिंदेंनी केलीय. त्यानंतर राहुल गांधींवर घाणघात करताना शिंदे म्हणाले राहुल गाधींनी स्वप्नात जरी विचार केला तरी ते पंतप्रधान होणार नाहीत. त्यांनी गर्मी झालं की ते लगेच परदेशात निघून जातात. गेल्या ५० वर्षात त्यांचे लॉन्चिंग झालं नसल्याची टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केलीय.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले
या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीच्या एकजुटीवर हल्लाबोल केला. सबका साथ सबका विकास आपला मंत्र आहे, मोदीजींच्या गाडीला सुजय विखेंची बोगी लागली की अहमदनगरचे सगळे लोक त्या गाडीत बसतील आणि वेगाने पुढे जातील. पण राहुल गांधी हे एक इंजिन आहेत, पण राहुल गांधीला कोणी इंजिन समजायला तयार नाही. त्यांच्याकडे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन, शरद पवारसाहेब म्हणतात मी इंजिन, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन, ममता बॅनर्जी म्हणतात मी इंजिन आहे तिथे सर्व इंजिन आहेत, मात्र डब्बे नाहीत अशी टीका फडणवीस यांनी केली.
ही निवडणूक विधानसभेची नाही ही, निवडणूक देशाच्या लोकसभेची आहे. देशाचा नेता, देश पाच वर्षाकरिता कोणाच्या हातात द्यायचं याची ही निवडणूक आहे. भारताचे नेतृत्व हे मोदीजींच्या हातात देण्याकरता आपण एकत्रित आलो आहोत असल्याचं फडणवीस म्हणाले. इतका कडाक्याचा उन्हाळा असतानाही आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने सुजयच्या पाठीशी उभे राहिला त्याचा अर्थ सुजायचा विजय पक्का असल्याचा विश्वास यावेळी फडणवीस यांनी व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.