Govinda Joined Shivsena: 'जायंट किलर' अभिनेते गोविंदा यांचा CM शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश; पहिली प्रतिक्रियाही दिली

Maharashtra Election 2024 Update: Actor Govinda Ahuja Joined Shivsena Shinde Group | अभिनेता गोविंदा आहुजा याआधी काँग्रेस पक्षाचा खासदार देखील राहिला आहे. तो लोकसभा निवडणूक याआधी निवडून आलाय. त्यानंतर तो आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. त्याला मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
Actor Govinda Ahuja Govinda Joined Eknath Shinde Group
Actor Govinda Ahuja Govinda Joined Eknath Shinde GroupSaam TV News

Actor Govinda Joined Shivsena Shinde Group :

२००४ साली लोकसभा निवडणुकीत तब्बल ५ वेळा खासदार राहिलेल्या राम नाईक यांना पराभवाची धूळ चारून राजकारणातील 'जायंट किलर' ठरलेले अभिनेते आणि माजी खासदार गोविंदा यांनी आज, गुरुवारी (२८मार्च,२०२४ ) शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला. शिंदे यांनीही गोविंदा यांचं स्वागत आणि अभिनंदन केलं. तर मला दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेन, असा विश्वास गोविंदा यांनी व्यक्त केला. तर लोकसभा निवडणूक लढवण्याबाबतच्या प्रश्नावर त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली.

जय महाराष्ट्र. मी एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. या दिवशी मी शिवसेनेत प्रवेश केला. मी २००४ ते २००९ मध्ये सुरुवातीला राजकारणात असताना, बाहेर पडल्यावर वाटलं होतं की मी पुन्हा कदाचित राजकारणात दिसणार नाही. परंतु, १४ वर्षांच्या वनवासानंतर मी पुन्हा सुरुवात करत आहे. एकनाथ शिंदेंच्या कृपेने मी पुन्हा या पक्षात आलो आहे. मी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेन, अभिनेता गोविंदा आहुजा पक्ष प्रवेशावेळी म्हणाले.

अभिनेता गोविंदा आहुजा (Actor Govinda Ahuja) याआधी काँग्रेस पक्षाचा खासदार देखील राहिला आहे. तो लोकसभा निवडणूक याआधी निवडून आलाय. त्यानंतर तो आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. त्याला मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. सगळ्यांचे लोकप्रिय अभिनेते गोविंदा यांचं आज शिवसेनेत मनापासून स्वागत करतो. सगळ्यांना आवडणारे, सर्व समाजांत लोकप्रिय असलेले गोविंदा यांचे मी मनापासून स्वागत आणि अभिनंदन करतो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदाच्या पक्षप्रवेशावेळी म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com