Maharashtra Election: जिवंत व्यक्तीला मृत दाखवलं, रामटेकमधील धक्कादायक प्रकार

Ramtek Lok Sabha Constituency: आज पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. रामटेक लोकसभा मतदार संघामध्ये जिवंत माणसाला मतदार यादीत मृत दाखवल्याचा अजब प्रकार समोर आलाय.
Maharashtra Election
Ramtek Loksabha ConstituencySaam Tv
Published On

नागपूरमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. सकाळपासून मतदानाची लगबग दिसून येत आहे. अशातच रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये (Ramtek Lok sabha Constituency) जिवंत माणसाला मतदार यादीत मृत दाखवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. या प्रकाराने एकच आश्चर्य व्यक्त केलं (Maharashtra Election) जात आहे.

राजेराम चैतु खंडाते, असं या व्यक्तीचं नाव आहे. या व्यक्तीच्या नावावर मतदार यादीत डिलीटेड शिक्का मारल्यात आला आहे. पण ही व्यक्ती मृत नसून अजून जिवंत आहे. जेव्हा ही (Living Person Shown Dead In Electoral Roll) व्यक्ती मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावरही पोहोचली. तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या प्रकारामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

रामटेक लोकसभा मतदार संघातील पारशीव गावातील झेडपीच्या शाळेत एक वोटिंग सेंटर आहे. तिथल्या बूथ क्रमांक २७० वर हा ((Ramtek Lok sabha) सगळा प्रकार समोर आलाय. राजेराम चैतु खंडाते हे जिवंत आहेत. मतदार यादीत मृत दाखवल्यानं आता मतदानाचा हक्क बजावायचा कसा? असा प्रश्नही त्यांनी पडला होता.

या घटनेनंतर मतदान केंद्रावर काही वेळासाठी गोंधळ निर्माण झाला होता. या घटनांंमुळे आता प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. जिवंत व्यक्तीला मृत दाखवल्याचा धक्कादायक प्रकार (Living Person Shown Dead) नागपूरमध्ये उघडकीस आला आहे. आज पहिल्या टप्प्याचं मतदान होत असताना नागपूरच्या रामटेक लोकसभा मतदार (Electoral Roll) संघातून ही खळबळजनक बाब समोर आली आहे.

Maharashtra Election
Maharashtra Election:'आधी मतदान, मग लग्न'; रामटेकमध्ये लग्नाआधी नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क

हा सगळा प्रकार समोर ( Maharashtra Election) आल्यानंतर वोटिंग सेंटरवर असलेल्या अधिकाऱ्याला विचारणा कऱण्यात आली. त्यानंतर त्यांनी वरिष्ठांना विचारुन बॅलेट पेपरवर राजेराम खंडाते यांचं मत नोंदवून घेतलं जाईल, असं सांगितलं जात आहे. मतदानाच्या पहिल्याच टप्प्यात समोर आलेल्या या भोंगळ कारभारने चर्चांना (Lok Sabha) उधाण आलंय. जिवंत माणसाला मृत दाखवल्याप्रकरणी नेमकं जबाबदार कोण? हा प्रश्न मात्र कायम आहे.

Maharashtra Election
Maharashatra Election: दिल्लीवारी आधी राजेंची बैलगाडी सवारी; साताऱ्यात उदयनराजे भोसलेंचं जोरदार शक्तिप्रदर्शन

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com