Maharashatra Election: ..मग कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांना एवढं फिरावं का लागतंय? सतेज पाटलांचा सवाल

Kolhapur Election : राज्यातील अमरावती, बारामती, पुणे, कोल्हापूर या ठिकाणी चुरशीच्या लढती असणार आहेत. कोल्हापूरमध्ये महायुतीकडून संजय मंडलिक यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती आहेत.
 Maharashatra Election Kolhapur Loksabha
Maharashatra Election Kolhapur LoksabhaSaam Tv

रणजीत माजगावकर, कोल्हापूर

Maharashatra Election Kolhapur Loksabha :

कोल्हापुरात रुसवे काढण्यासाठी वरिष्ठ नेत्यांना यावं लागलं होतं. आमच्याकडे कोल्हापूरची जनताच शाहू महाराजांचा फॉर्म भरायला आली होती. त्यामुळे कोणाच्या पायाखालची वाळू सरकाय लागली हे आता लक्षात आलं आहे, असं आमदार सतेज पाटलांनी महायुतीला टोमणा मारलाय. सरकारचा दोन वर्षाचा कारभार आणि शासन आपल्या दारी योजना यशस्वी झाली असती तर मुख्यमंत्र्यांना वारंवार कोल्हापुरात येण्याची गरज नसती, असा टोला सतेज पाटील यांनी मारलाय.

राज्यातील लोकसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील अमरावती, बारामती, पुणे, कोल्हापूर या ठिकाणी चुरशीच्या लढती असणार आहेत. कोल्हापूरमध्ये महायुतीकडून संजय मंडलिक यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती आहेत. शाहू महाराज यांना अनेकांकडून पाठिंबा मिळत आहे. दोन दिवसापूर्वीच महायुतीच्यावतीने माजी नगरसेवकांचा मेळावा घेत १०५ नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता.

आज कोल्हापुरातील २२० माजी नगरसेवक आणि १८ माजी महापौर यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. न्यू पॅलेस इथं झालेल्या मेळाव्यात या सर्व माजी नगरसेवक, महापौर यांनी उपस्थिती लाहून शाहू महाराज यांचा प्रचार करण्याचा निर्धार केला. यावरून कोल्हापूरमधील निवडणूक रंजक होणार असल्याचं दिसत आहे.

महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळणार प्रतिसाद पाहता आमदार सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदेंना टोला लगावलाय. कोल्हापुरात रुसवे काढण्यासाठी वरिष्ठ नेत्यांना यावं लागलं होतं. तर शाहू महाराजांचा फॉर्म भरण्यासाठी जनता आली होती. जर सरकारचा दोन वर्षाचा कारभार आणि शासन आपल्या दारी योजना राज्यात यशस्वी झाली असती तर मुख्यमंत्र्यांना इतकं फिरावं लागलं नसतं असं पाटील म्हणालेत.

 Maharashatra Election Kolhapur Loksabha
Maharashtra Lok Sabha Election Phase 1 : महाराष्ट्रातील पाच मतदारसंघात प्रचाराचा ताेफा आज थंडावणार; काॅंग्रेससह शिवसेनेचा राेड शाे, गडकरींची सोशल मीडियास पसंती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com