Madha Loksabha: शरद पवारांची माढ्यात एन्ट्री अन् CM शिंदेंना मोठा धक्का! बडा नेता 'तुतारी' हाती घेणार

Sharad Pawar Madha Loksabha Constituency News: करमाळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेत तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Sharad Pawar Madha Loksabha Constituency News:
Sharad Pawar Madha Loksabha Constituency News:Saamtv

अक्षय बडवे, प्रतिनिधी|ता. १४ एप्रिल २०२४

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा मतदार संघात एन्ट्री करताच महायुतीला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. करमाळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेत तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. २६ एप्रिल रोजी ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे अकलूजमध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या बंगल्यावर दाखल झालेत. यावेळी शरद पवार (Sharad Pawar), माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सुशिलकुमार शिंदे यांच्यासह माढ्यातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

यावेळी करमाळ्याचे माजी आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते नारायण आबा पाटील यांनीही शरद पवार यांची भेट घेतली असून ते लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. २६ एप्रिल रोजी नारायण आबा पाटील यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. एकीकडे माढ्यातून राजकीय गणिते बिघडत असतानाच महायुतीसाठी हा आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे.

Sharad Pawar Madha Loksabha Constituency News:
Jamner Crime News : पत्नी व अकरा महिन्याच्या चिमुकलीची हत्या; गावी येत पतीनेही संपविले जीवन

दरम्यान, यावेळी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते आणि माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधु रघुनाथराजे नाईक निंबाळकरही शरद पवार यांच्या भेटीला आले होते. सध्या रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत. त्यामुळे रघुनाथ राजेही शरद पवारांची साथ देणार असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

Sharad Pawar Madha Loksabha Constituency News:
Jalgaon News : कुलर चालू करायला गेली व जीव गमावला; विजेच्या जोरदार झटक्याने चिमुकलीचा मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com