Sharad Pawar Speech: शशिकांत शिंदेंना अडवण्याचा प्रयत्न; अटक केल्यास महाराष्ट्रभर संघर्ष करु.. शरद पवारांचा इशारा!

Sharad Pawar Speech Dahiwadi Sabha: माढ्याचे उमेदवार धैर्यशिल मोहिते पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, भूषणराजे होळकर, प्रभाकर देशमुख आदी नेते या सभेला उपस्थित होते. या सभेत बोलताना शरद पवार यांनी मोदी- शहांवर जोरदार हल्लाबोल केला.
Sharad Pawar Speech Dahiwadi Sabha:
Sharad Pawar Speech Dahiwadi Sabha:Saamtv

ओंकार कदम| दहिवडी, ता. २७ एप्रिल २०२४

माढा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांची आज दहिवडी येथील बाजार पटांगणावर जाहीर सभा होत आहे. माढ्याचे उमेदवार धैर्यशिल मोहिते पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, भूषणराजे होळकर, प्रभाकर देशमुख आदी नेते या सभेला उपस्थित होते. या सभेत बोलताना शरद पवार यांनी मोदी- शहांवर जोरदार हल्लाबोल केला.

काय म्हणाले शरद पवार?

"बारामती लोकसभा मतदार संघात सभा होती त्या ठिकाणी न्यू यॉर्क टाईम चे प्रतिनिधी माहिती घेण्यासाठी आले होते. जगाचे या निवडणूकीकडे लक्ष लागले आहे. ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. जगातील अनेक नेत्यांनी या देशाची लोकशाही पाहिली. जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, यांची सत्ता पाहिली, असे शरद पवार म्हणाले.

तसेच "गेली 10 वर्ष या देशाचे सरकार नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्तीच्या हातात आहे. याआधी मनमोहन सिंग यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात ११० वेळा पत्रकार परिषद घेतल्या. मात्र नरेंद्र मोदींनी एकदाही माध्यमांशी संवाद साधला नाही. याआधी संसदेतील अधिवेशनाला पंतप्रधान जातीने हजर राहायचे, त्यांचा लोकशाहीवर विश्वास होता, मात्र सध्या सत्तेचा गैरवापर सुरू आहे," असा टोलाही त्यांनी लगावला.

Sharad Pawar Speech Dahiwadi Sabha:
छत्रपतींच्या गादीचा मान ठेवा म्हणता अन् साताऱ्यातून उमेदवार देता; नितेश राणे कुणावर संतापले?

शशिकांत शिंदेंना अडवण्याचा प्रयत्न..

"झारखंडचे मुख्यमंत्री, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली. गृहमंत्री अनिल देशमुख, शिवसेनेचे संजय राऊत सामना मधून सरकारवर टीका करतात यांनाही काही गुन्हा नसताना तुरुंगात टाकले. तसेच आमचे सातारचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही वाट बघतोय, शशिकांत शिंदेंना अटक केल्यास आम्ही रस्त्यावर उतरु, महाराष्ट्रभर संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही," असा इशाराही त्यांनी दिला.

Sharad Pawar Speech Dahiwadi Sabha:
Sambhajinagar News : अंबड टाकळी परिसरात सिलिंडरचा स्फोट, घर संसाराची राखरांगोळी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com