Madha Lok Sabha : माढा मतदारसंघात भाजपला जोर का झटका; विजयसिंह मोहिते-पाटीलही पवार गटाच्या वाटेवर

Lok Sabha Election 2024 : माढा मतदारसंघात भाजपला जोरदार धक्का देण्यात शरद पवारांना यश आलंय. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यानंतर आता विजयसिंह मोहिते पाटील हे देखील शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.
Madha Lok Sabha
Madha Lok SabhaSaam Digital

माढा मतदारसंघात भाजपला जोरदार धक्का देण्यात शरद पवारांना यश आलंय. उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज असलेल्या धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. शरद पवार गटातून ते निवडणूक लढवणार आहेत. त्यांचे काका विजयसिंह मोहिते पाटील हे देखील शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. राज्यात बारामती इतकीच चुरस माढा मतदारसंघात पहायला मिळत आहे. भाजपचे विद्यमान खासदार रणजिंतसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर होताच नाराजीचा सूर उमटला होता. तो आता कमालीचा वाढला आहे. भाजपच्या वरीष्ठांनाही ही नाराजी दूर करता आली नाही. उमेदवारीसाठी इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपला रामराम केला आहे.

14 एप्रिलला ते शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. 16 एप्रिलला माढ्यातून ते उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी अकलूजला येत मोहिते पाटील कुटुंबाची मनधरणी केली होती. मात्र त्याला यश आलं नाही. इतकचं नाही तर एकेकाळचे शरद पवारांचे साथीदार माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटीलही शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. विजयसिंह यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांनी साम टीव्हीशी बोलताना ही माहिती दिलीय. मोहिते पाटील ईडीला घाबरत नाही, असंही त्यांनी ठणकावून सांगितलंय.

माढ्यात अशा घडामोडी घडत असताना अडचणीत आलेले रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनी तातडीनं नागपुरात धाव घेतली. देवेंद्र फडणवीसांशी चर्चा केली. यावेळी राहुल कुल, जयकुमार गोरेही उपस्थित होते. पूर्वी एकमेकांच्या विरोधात झालेले संघर्ष एका क्षणात दूर होत नाही. टप्प्याटप्प्यानं सगळं सुरळीत होईल, असा विश्वास रणजितसिंह यांनी व्यक्त केलाय.

Madha Lok Sabha
Tushar Gandhi : 'वंचित भाजपची बी टीम, मतदान करू नका'; तुषार गांधींच्या आवाहनाने खळबळ

अजित पवारांनीही तातडीनं बैठक घेत माढामध्ये युतीधर्म पाळा असे निर्देश पक्षाच्या नेत्यांना दिलेत. राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक-निंबाळकांनी यापूर्वीच रणजितसिंह यांची उमेदवारी बदलण्याची उघडपणे मागणी केली होती. दरम्यान अशाप्रकारे राजीनामा देणं योग्य नव्हतं. जनता मोदींच्या पाठीशी आहे, अशी प्रतिक्रिया भाजपनं दिली आहे.माढ्यात शरद पवारांना मोहिते-पाटील घराण्याची साथ मिळाली आहे. त्यामुळे महायुतीसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. माढ्यातील या राजकीय संघर्षात मतदारांचा कौल कुणाच्या बाजुनं असणार याची उत्सुकता आहे.

Madha Lok Sabha
Rahul Gandhi: भाजपचे नेते उघडपणे सांगतात की, ते सत्तेवर आल्यास संविधान बदलू: राहुल गांधी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com