लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजेच देशातील सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत देशभरातील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी अनेक सुचना तसेच खुलासे केले. यावेळी राजीव कुमार यांनी विविध मुद्द्यांवर बोलताना शेरोशायरी करत खास अंदाजात टोलेबाजी केली.
फोडाफोडीच्या राजकारणावरुन टोला..
यावेळी बोलताना राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी राजकीय पक्षांना प्रचारादरम्यान वैयक्तिक टीका टाळण्याची आणि शिष्टाचार राखण्याची विनंती केली. तसेच "सध्याच्या राजकारणात मित्र आणि शत्रु होण्यास वेळ लागत नाही," असे म्हणत फोडाफोडीच्या राजकारणावर भाष्य केले. त्यासाठी त्यांनी प्रसिद्ध उर्दू कवी बशीर बद्र यांच्या कवितेचा खास उल्लेख केला. "दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हों!" असे ते म्हणाले.
त्याचबरोबर पुढे ते म्हणाले की, तुम्ही जे बोलाल ते डीजिटल युगात लगेच रेकॉर्ड होते अन् पुन्हा पुन्हा वाजत राहते. त्यामुळे वाईट शब्दांचा उल्लेख टाळा. कारण शब्दाने वाद झाला की नात्याचा धागा तुटतो. हे सांगत असतानाच त्यांनी कवी रहीम यांची काही वाक्येही सांगितली. "रहिमन धागा प्रेम का, मत तोड़ो छिटकाय, टूटे से फिर न मिले, मिले गाँठ परिजाय,"! या कवितेचा त्यांनी उल्लेख केला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
ईव्हीएमवर शंका घेणाऱ्यांना उत्तर..
आपल्या भाषणाच्या शेवटी राजीव कुमार यांनीही ईव्हीएमवर (EVM) शंका घेणाऱ्या विरोधकांवरही कवितेतून निशाणा साधला. "अधूरी हसरतों का इल्जाम हर बार हम पर लगाना ठीक नहीं, वफा खुद से नहीं होती खता ईव्हीएम की कहते हो," अशा खास शायराना अंदाजात त्यांनी विरोधकांना उत्तर दिले. तसेच ही शायरी मी स्वतः रचल्याचेही त्यांनी सांगितले. (Loksabha Election News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.