Beed Loksabha: बीडमध्ये बुथ कॅप्चरींगचा शरद पवार गटाचा आरोप; निवडणूक आयोगाकडे फेरमतदानाची मागणी

Beed Loksabha Both capturing : बीड लोकसभेसाठी 13 मे रोजी मतदान झालं. मात्र यावेळी बीडमधील काही मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याचा करण्यात येत आहे.
Beed Loksabha: बीडमध्ये  बुथ कॅप्चरींगचा शरद पवार गटाचा आरोप; निवडणूक आयोगाकडे फेरमतदानाची मागणी
Beed Loksabha Both capturing

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

बीडच्या परळीत बोगस मतदान झाल्याचा आरोप करीत शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. या तक्रारीची दखल घेत आयोगाने बीड जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवलाय. त्यामुळे बीडचं राजकारण पुन्हा ढवळून निघालंय. बीडमध्ये फेरमतदानाची चर्चाही रंगू लागलीय.

राज्यातील सगळ्यात हॉटस्पॉट ठरलेल्या बीड लोकसभेसाठी 13 मे रोजी मतदान झालं. मात्र यावेळी बीडमधील काही मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान झाल्याचा गंभीर आरोप करत शरद पवार गटानं आक्रमक पवित्रा घेतलाय. बीडमध्ये फेरमतदान घेण्यात यावं अशी मागणीही पवार गटानं केलीय.

तिसऱ्या टप्प्यात उन्हाच्या झळांमुळे मतांचा टक्का चांगलाच घटला होता. मात्र बीडकरांनी उन्हाच्या झळा आणि वाढलेल्या तापमानाला न जुमानता 70.91 इतकं विक्रमी मतदान केलं.मात्र या मतदानानंतर बीडमधील वेगवेगळ्या ठिकाणी बुथ ताब्यात घेऊन बोगस मतदान केल्याचा दावा करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यावरून राजकारण चांगलंच तापलं होतं.

या बोगस मतदानाप्रकरणी बीड लोकसभेचे शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केलीय. तर हा बोगस मतदानाचा परळी पॅटर्न असल्याचं म्हणत रोहित पवारांनी मतदानावरच प्रश्नचिन्ह उभं केलय. निवडणूक आयोगाकडून पवार गटाच्या तक्रारीवर अद्याप उत्तर आलं नाही. गुजरातमध्ये असाच प्रकार घडल्यानंतर तिथे फेरमतदान जाहीर करण्यात आलं. महाराष्ट्रात 100 पेक्षा जास्त व्हिडीओ असल्यानं फेरमतदान हा पर्याय असू शकतो असं जितेंद्र आव्हाडांनी सूचित केलंय.

बीडमध्ये पंकजा मुंडे विरूद्ध बजरंग सोनावणे अशी काट्याची लढत असल्यानं राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलंय. मात्र पवार गटानं बोगस मतदानावरून अऩेक सवाल उपस्थित करत निवडणूक आयोगाकडेच दाद मागितलीय. त्यामुळे निवडणूक आयोग पवार गटाच्या तक्रारीची दखल घेणार की 4 जूनचा निकालच फायनल असणार? हे पाहणं महत्वाचं असेल.

Beed Loksabha: बीडमध्ये  बुथ कॅप्चरींगचा शरद पवार गटाचा आरोप; निवडणूक आयोगाकडे फेरमतदानाची मागणी
Maharashtra Lok Sabha: संकटमोचकालाच टेंशन? भाजपच्या पॉकेट्समध्येच कमी मतदान? नाशिक, दिंडोरीत बूथनिहाय रिपोर्ट मागवला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com