Satara Lok Sabha: उदयनराजेंचं राजकीय भवितव्य ठरवणारी निवडणूक ठरणार? शरद पवारांची जादू चालणार?

Loksabha Election 2024 : सलग दोन वेळा निवडून आलेले उदयनराजे 2019च्या पोटनिवडणुकीत पराभूत झाले. उदनराजे 87,717 मतांनी पराभूत झाले होते. सलग तिसऱ्यांदा राष्ट्रवादी क़ॉंग्रेसचा उमेदवार निवडून आला होता.
satara Loksabha
satara Loksabha Saam TV
Published On

प्रसाद जगताप

Satara Lok Sabha :

सातारा लोकसभा मतदारसंघ! पश्चिम महाराष्ट्रात मोडणाऱ्या महत्त्वाच्या मतदारसंघांपैकी एक! स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखला गेलेला सातारा... लोकसभेत काय म्हणून ओळखला जातो? साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांनी लोकसभेत एन्ट्री घेतली होती. मात्र मागच्या पोटनिवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. हे कसं घडलं? आणि आता 2024 ला काय घडू शकतं? तिथे राजकीय वजन नेमकं कुणाचं जास्त आहे? या सगळ्यांचा आढावा घेऊया.

सातारा लोकसभा मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गात मोडतो. सातारा लोकसभेत एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये वाई, कोरेगाव, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण आणि सातारा यांचा विधानसभांचा समावेश आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती. त्यांच्याविरोधात पुरुषोत्तम जाधव यांनी अपक्ष निवडणूक लढवली. या निवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा तब्बल 3 लाख 66 हजार 364 हजार मतांच्या फरकाने विजय झाला होता.

त्यानंतर 2019 सालीही उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली. यावेळी त्यांची शिवसेनेच्या नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा 1 लाख 26 हजार 528 मतांनी पराभव केला होता. मात्र काही महिन्यातच उदयनराजे यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

satara Loksabha
Sharad Pawar News : सातारा लाेकसभा मतदारसंघात श्रीनिवास पाटील यांची माघार, शरद पवार निवडणुकीच्या मैदानात? (Video)

त्यामुळे साताऱ्यात पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले विरुद्ध श्रीनिवास पाटील असा सामना रंगला. या पोटनिवडणुकीच्या प्रचारात मैदान गाजवलं, ते शरद पवारांनी. पवारांची पावसातली सभा, त्याला मिळालेला भावनिक प्रतिसाद यामुळे राजेंना धक्का बसला.

सलग दोन वेळा निवडून आलेले उदयनराजे 2019च्या पोटनिवडणुकीत पराभूत झाले. उदयनराजे 87 हजार 717 मतांनी पराभूत झाले होते. म्हणजे सातारा लोकसभेच्या जागेवर सलग तिसऱ्यांदा राष्ट्रवादी क़ॉंग्रेसचा उमेदवार निवडून आला होता. सलग दोन वेळा राष्ट्रवादीच साताऱ्यात लोकसभा जिंकली. आता 2019 आणि 2014 मध्ये पक्षांना मिळालेल्या लोकसभेतील मतांची आकडेवारीवर एक नजर टाकूया. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

2014 ला राष्ट्रवादीला 53.5 टक्के मतं पडली. तर युतीने आपला उमेदवारच दिला नाही. 2019 मध्ये राष्ट्रवादीला 51.9 टक्के इतकी मतं मिळाली. तर शिवसेनेला 40.6 टक्के इतकी मतं मिळाली. म्हणजेच आत्तापर्यंत तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे सातारकरांचा कल असल्याचं दिसतं. पोटनिडणुकीतही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने या मतदारसंघात बाजी मारली.

सातारा लोकसभेतील एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. 2014 साली राष्ट्रवादी कॉंग्रेसचं ज्या सातारा लोकसभा मतदारसंघात निर्वीवाद वर्चस्व होतं, ते 2019 ला दिसत नाही. 2014 ला 6 पैकी 6 विधानसभा मतदारसंघ राखणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला 2019 मध्ये केवळ 2 मतदासंघांवर आपला ताबा ठेवता आला आणि 4 मतदासंघ गमवावे लागले..

पण आता 2024 मध्ये येथील राजकीय परिस्थिती खूप बदलली आहे. कारण 2019 नंतर महाराष्ट्राने 4 राजकीय भूकंप पाहिले आहेत. याचे पडसाद सातारा लोकसभा मतदारसंघातही पाहायला मिळालेत.

satara Loksabha
Satara Politics : अजित पवार गटातील नेता शरद पवारांच्या भेटीला; निवडणुकीआधी साताऱ्यातील राजकीय समीकरणं बदलणार?

2024 मध्ये कुणाची किती ताकद?

राष्ट्रवादी अजित पवार - 1

राष्ट्रावदी शरद पवार - 1

शिवसेना शिंदे - 2

शिवसेना ठाकरे - 0

काँग्रेस - 1

भाजप - 1

2019 मध्ये सातारा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे शिवेंद्रराजे भोसले विजयी झाले. कोरेगावचे महेश शिंदे आणि पाटणचे शंभूराज देसाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत गेले. वाईच्या मकरंद पाटलांनी राष्ट्रवादीतून अजित पवारांना पाठिंबा दिला. कराड उत्तरचे बाळासाहेब पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटासोबतच राहीले. त्यामुळे आता भाजपचे 1, शिवसेना शिंदे गटाचे 2, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रत्येकी 1-1 आणि कॉंग्रेसचा 1 असे एकूण 6 आमदार विभागले गेले आहेत. पण राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटण्याआधी चित्र वेगळं होतं.

राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटण्याआधी दोघांकडे प्रत्येकी 2-2 आमदार होते, कॉंग्रेसकडे 1 आमदार होता आणि भाजपकडे केवळ एक आमदार होता. म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळात 6 मतदारसंघांपैकी 5 मतदारसंघांवर मविआचा ताबा होता. केवळ 1 मतदारसंघ भाजपला राखता आला होता. पण आता चित्र बदललंय. आता महायुती सरकारजवळ एकूण 4 विधानसभा मतदारसंघ आहेत. अर्थात पक्षफुटीमुळे विधानसभा मतदारसंघांचीही विभागणी झालीये, ज्यात महायुतीचं पारडं जड दिसतंय.

साताऱ्यात मराठा फॅक्टर महत्वाचा ठरतो. या समीकरणात उदयनराजे फिट बसतात. म्हणून उदयनराजे सर्वच पक्षांना हवेहवेसे वाटतात. पण साताऱ्यात केवळ मराठा फॅक्टरच चालू शकतो असं नाहीये. एससी, एसटी आणि मुस्लीम मतदारांची आकडेवारीही निर्णायक आहे. या दलित मतदानाची आकडेवारी एकून 16 टक्क्यांपर्यंत जाणारी आहे . ही आकडेवारीही फार निर्णायक ठरणारी आहे. यात वंचित फॅक्टरही महत्वाचा ठरू शकतो, असं जाणकार सांगतात.

satara Loksabha
Loksabha Election 2024: काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार? भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ

2019 च्या पोटनिवडणुकीपर्यंत या मतदारसंघावर आघाडीचं वर्चस्व होतं. 2014 साली या मतदारसंघात युतीने आपला उमेदवार दिला नव्हता. 2019 साली उमेदवार दिला पण तो पराभूत झाला होता. तर पोटनिवडणुकीतही भाजपकडून लढणारे उदयनराजे भोसले पराभूत झाले. अर्थात आतापर्यंत तरी या लोकसभा मतदरसंघाचा फायदा आघाडीला झाल्याचं दिसतंय.

पक्षातील फुटीनंतरचं राजकारण कसंय?

पक्षातील फुटीनंतर मतदारसंघाचं राजकारण गुंतागुंतीचं झालंय. राष्ट्रवादी एकहाती सत्ता असणारा हा लोकसभा मतदारसंघ आता पूर्णपणे विखुरला गेलाय. त्यातल्या त्यात मराठा फॅक्टर आणि छत्रपतींची गादी असणारे उदयनराजे भोसले हे भाजपच्या गोटात आहेत. त्यामुळे पक्षनिहाय आकडेवारीत जरी या लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचं प्रभाव पाहायला मिळत असलं, तरी ते 2024 नंतर टिकून राहील का? याबाबत शंका आहे.

कारण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे भोसले यांचा पराभव केला. पण दोन्ही उमेदवारांमध्ये 87 हजार 717 मतांचा होता, जो फार मोठा नाही. तसेच श्रीनिवास पाटलांनी देखील या निवडणुकीतून तब्येतीच्या कारणास्त माघार घेतली आहे. त्यामुळे उदयनराजे नेमकं कुणाच्या बाजूने लढतात? मराठा मतदारांचा कल कुणाच्या बाजूने जातो? वंचितची भूमिका या मतदारसंघात काय असते? आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार कोण असणार? यावरुन सातारा लोकसभा मतदारसंघाचं गणित स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com