Sanjay Raut: PM मोदींचा शरद पवारांवर हल्ला, संजय राऊतांकडून चोख प्रत्यूत्तर; म्हणाले...

Sanjay Raut Press Conference: संजय राऊत यांनीही पंतप्रधानांवर निशाणा साधला असून मोदींचा एक अतृप्त आत्मा आहे, आत्मा महाराष्ट्रात भटकत आहे, असा टोला लगावला.
Sanjay Raut And Narendra Modi
Sanjay Raut And Narendra ModiSaam TV

मयुर राणे, मुंबई|ता. ३० एप्रिल २०२४

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल पुण्यामध्ये जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर निशाणा साधताना भटकता आत्मा असा उल्लेख केला होता. पंतप्रधान मोदींच्या या टीकेवरुन महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावर बोलताना खासदार संजय राऊत यांनीही पंतप्रधानांवर निशाणा साधला असून मोदींचा एक अतृप्त आत्मा आहे, आत्मा महाराष्ट्रात भटकत आहे, असा टोला लगावला.

काय म्हणाले संजय राऊत?

"मोदी काय म्हणतात त्याच्याकडे फार लक्ष देऊ नका ते भटकते आत्मे आहेत. मोदींचा एक अतृप्त आत्मा आहे आणि तो आत्मा महाराष्ट्रात भटकत आहे. जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत जे मराठी माणसाचे शत्रू आहेत अशा सर्वांचे आत्मे महाराष्ट्रात गेल्या चारशे वर्षांपासून भटकत आहेत. त्यात हा नवीन गुजरातचा आत्मा आहे," असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

"काल मोदीजी पुण्यात होते. त्यांनी भाषणामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा साधा उल्लेख तरी केला का? कारण त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा राग आहे. त्यांना संविधान बदलायचे आहे. अशी टीका संजय राऊत यांनी केली. तसेच उद्या एक मे आहे. उद्या 105 लोकांनी बलिदान दिला ते लोक मोदींना शाप देणार," असेही राऊत म्हणाले.

Sanjay Raut And Narendra Modi
Stone Pelting In Mihir Kotecha Ralley: भाजप उमेदवाराच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; १ महिला जखमी, मुंबईत वातावरण तापलं

"प्रधानमंत्री जिकडे जातात तेथे फक्त काँग्रेसवर हल्ला करतात. महाराष्ट्रात येऊन उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर हल्ला करतात. जसं मुघलांना त्या काळात मुघलांच्या घोड्यांना संताजी धनाजींचे घोडे दिसायचे तसे यांना आम्ही दिसतो. दिल्लीच्या मुघलांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे दिसत आहेत," अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली.

Sanjay Raut And Narendra Modi
Bus Truck Accident At Rahud Ghat: मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात; बसचा टायर फुटून ६ जण दगावल्याची भीती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com