Navneet Rana: '१५ सेकंद पोलीस हटवा, कुठे गायब व्हाल समजणार नाही...' नवनीत राणांचा ओवैसी बंधूंना थेट इशारा

Navneet Rana Vs Akbaruddin Owaisi: भाजपच्या स्टार प्रचारक असलेल्या नवनीत राणा यांनी ओवेसी बंधुंवर निशाणा साधताना १५ सेकंद पोलीस हटवा, कुठे गायब व्हाल कळणार नाही, असे थेट आव्हान दिले. त्यांच्या या भाषणाने भाजप- एमआयएममध्ये वाद रंगण्याची शक्यता आहे.
Navneet Rana Vs Akbaruddin Owaisi:
Navneet Rana Vs Akbaruddin Owaisi: Saamtv

अमर घटारे, अमरावती|ता. ९ मे २०२४

देशभरात लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. लोकसभेच्या प्रचारात राजकीय नेत्यांमध्ये जोरदार आरोप- प्रत्यारोप, टीका, टिप्पणी अन् आव्हाने दिली जात आहेत. भाजपच्या स्टार प्रचारक असलेल्या नवनीत राणा यांनी ओवैसी बंधूंवर निशाणा साधताना १५ सेकंद पोलीस हटवा, कुठे गायब व्हाल कळणार नाही, असे थेट आव्हान दिले आहे. त्यांच्या या भाषणाने भाजप- एमआयएममध्ये वाद रंगण्याची शक्यता आहे.

काय म्हणाल्या नवनीत राणा?

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा सध्या भाजपच्या स्टार प्रचारक म्हणून आंध्र प्रदेश दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी हैद्राबाद शहरातील चंपापेठ येथे श्रीमती माधवीलता यांच्या प्रचार साठी युवा मेळावा घेतला. यावेळी नवनीत राणा यांनी ओवैसी बंधूंवर जोरदार निशाणा साधत थेट आव्हान दिले.

" तुम्ही म्हणता १५ मिनिटे पोलीस हटवा आम्ही काय आहे ते सांगतो. पण युवकांनी ठरवले तर तुम्हाला १५ मिनिटे लागतील मात्र १५ सेकंद पोलीस हटवा, छोटे ओवेसी अन् मोठ्या ओवैसीला समजणार नाही. तुम्ही कुठे होता? कुठे गायब झाले, तुम्हाला कळणार नाही;" असा धमकी वजा इशाराच नवनीत राणा यांनी दिला.

Navneet Rana Vs Akbaruddin Owaisi:
Mahuli Fort : ट्रेकिंग करताना पाय घसरून खोल दरीत कोसळला; माहुली गडावरील घटना, तरुण गंभीर जखमी

वारिस पठाण यांचे सडेतोड प्रत्यूत्तर..

दरम्यान, नवनीत राणा यांच्या या धमकीनंतर वारिस पठाण यांनीही सडेतोड प्रत्यूत्तर दिले आहे. "नवणीत राणा यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. काय करणार आहात? १५ मिनिटात मारुन टाकणार आहात का? मुस्लिम नेत्यांना मारण्याचा कट आहे का? पोलीस प्रशासन काय करत आहे?" असा संतप्त सवाल वारिस पठाण यांनी केला आहे.

Navneet Rana Vs Akbaruddin Owaisi:
संभाजीनगर : दुष्काळाची दाहकता वाढली, 459 गावांत 646 टँकरद्वारे पाणीपुरवठा; 274 गावांसाठी 340 विहिरींचे अधिग्रहण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com