Bhiwandi Lok Sabha: कपिल पाटील हॅटट्रिक साधणार की महाविकास आघाडीची जादू चालणार?

Loksabha Election 2024 : भाजपचे कपिल पाटील यांनी 2014 आणि 2019 मध्ये आपली खासदारकी कायम ठेवली आहे. त्यामुळे 2024 मध्ये कपिल पाटील हॅट्रिक मारणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
Bhiwandi Lok Sabha
Bhiwandi Lok SabhaSaam TV

पुनीत कुलकर्णी

भिवंडी  लोकसभा मतदारसंघ ठाणे जिल्ह्यात येतो. भिवंडीत सध्या भाजपचे कपिल पाटील विद्यमान खासदार आहेत. भिवंडी लोकसभा मतदारसंघ 2008 मध्ये अस्तित्वात आला. तेव्हापासून 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तर 2014 आणि 2019 मध्ये भाजपने ही जागा जिंकून आणली. 2009 मध्ये सुरेश तावरे या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. तर 2014 आणि 2019 मध्ये भाजपचे कपिल पाटील यांनी आपली खासदारकी कायम ठेवली आहे. त्यामुळे 2024 मध्ये कपिल पाटील हॅट्रिक मारणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

भिवंडी लोकसभा मतदास संघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये भिवंडी ग्रामीण, शहापूर, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिमआणि मुरबाड हे मतदारसंघ येतात. तर भिवंडी ग्रामीण आणि शहापूर हे मतदारसंघ अनुसूचित प्रवर्गासाठी राखीव आहेत.

2014 मध्ये भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी तब्बल 4 लाख 10 हजार 752 मतं मिळाली. तर काँग्रेसकडून लढणारे विश्वनाथ पाटील हे 3 लाख 01 हजार 452 इतकी मतं त्यांना मिळाली होती.मतांचं मार्जिन पाहिलं तर 1 लाख 9 हजार 300 मतांनी कपिल पाटील यांनी विश्वनाथ पाटलांचा पराभव केला होता. त्यामुळे या निवडणुकीत कपिल पाटलांचं पारड जड असल्याचं समजतंय.

Bhiwandi Lok Sabha
Palghar Lok Sabha 2024 : पालघरमध्ये यंदा कुणाची जादू चालणार? बविआ फॅक्टर ठरणार निर्णायक

2019 च्या निवडणुकीत राजकीय समीकरणं थोडी वेगळी पाहायला मिळाली. कारण भाजपचे कपिल पाटील यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला असून त्यांना 5 लाख 23 हजार 583 मत मिळाली होती. तर काँग्रेसचे उमेदवार सुरेश तावरे यांना यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यांना 3 लाख 67 हजार 254 मत मिळाली होती.

2014 आणि 2019 ची आकडेवारी

2014 आणि 2019 ची आकडेवारी आपल्याला सगळी परिस्थिती सांगून जाते. 2014 मध्ये कपिल पाटलांनी भाजपकडून निवडणूक लढवली. त्यावेळी भाजपला 47.45 टक्के मतं मिळाली. तर काँग्रेसला 34.82 टक्के मते मिळाली. त्यावेळेस भाजपचं वजन जास्त असल्याचं जाणवतं. पण या निवडणुकीत मनसेच्या फॅक्टरकडे दुर्लक्ष करुन चालत नाही. कारण 10.81 टक्के मत मनसेने मिळवल्याचं दिसतं. 2019 मध्ये भाजपला 52.92 टक्के मत मिळाल्याच दिसतं तर काँग्रेसला 37.17 टक्के मत मिळालीत.

2014 मध्ये आमदारांचं गणित पाहिलं तर भाजपचे 3, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचा 1 आमदार होता. तर 2019 मध्ये भाजपचे 2 शिवसेनेचे 2 राष्ट्रवादीचा 1 आणि समाजवादी पक्षाचा 1 असं गणित पाहायला मिळालं.

Bhiwandi Lok Sabha
Kalyan Lok Sabha Constituency : कल्याणमध्ये शिंदेंविरोधात मित्रपक्षांचीच फिल्डिंग?; श्रीकांत शिंदे हॅटट्रिक साधणार का?

सध्या कुणाकडे किती आमदार?

भिवंडी पश्चिममधून महेश चौघुले तर मुरबाडमधून किसन कथोरे हे भाजपचे 2 आमदार आहेत. रईस शेख हे समाजवादी पक्षाचे एकमेव आमदार आहेत. भिवंडी ग्रामीण मधून शांताराम मोरे आणि कल्याण पश्चिममधून विश्वनाथ भोईर हे शिवसेनेचे 2 आमदार आहेत तर शहापूरमधून दौलत दरोडा हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत.

2014 आणि 2019 मध्ये खासदार कपिल पाटील यांना जनतेने चांगलाच पाठिंबा दिलाय. सध्या कपिल पाटील मोदी सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री आहेत. त्यांना भाजपने तिसऱ्यांदा तिकीट जाहीर सुद्धा केलंय. तर महाविकास आघाडीने सुद्धा आपला उमेदवार रिंगणात उतरवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे भिवंडी लोकसभेची निवडणूक चांगलीच रंगतदार होणार यात शंका नाही. मविआकडून लोकसभेसाठी दयानंद चोरगेंचं नाव चर्चेत असल्याचं बोललं जात आहे.

पण 2024 ची निवडणूक भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटात होणार असं बोललं जातंय. त्यामागचं कारण असं आहे की सुरेश म्हात्रे यांनी नुकताच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश केला. ते भिवंडी लोकसभेची जागा कपिल पाटलांविरोधात लढवतील असं बोललं जातंय. 2024 मध्ये बाजी कोण मारणार, कपिल पाटील हॅट्रिक मारणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com