Lok Sabha Election 2024 : सुप्रिया सुळेंवर सुनेत्रा पवारांचं ५५ लाखांचं कर्ज; निवडणूक आयोगाला सादर केलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Lok Sabha Election : सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याकडून ५५ लाख रुपये उसणे घेतल्याचं म्हटलं आहे.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 Saam Digital

बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद-भावजय लढत पहायला मिळत आहे. पवार गटाकडून सुप्रिया सुळे तर अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे राज्यसह संपूर्ण देशाचं लक्ष या मतदासंघाकडे लागल आहे. दोन्ही उमेदवारांनी आजच उर्ज दाखल केला आहे. यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शनही पहायला मिळालं. दरम्यान सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याकडून ५५ लाख रुपये उसणे घेतल्याचं म्हटलं आहे.

सुप्रिया सुळे यांच्या शपथपत्रातील सर्वात महत्त्वाची बाब होती ती म्हणजे त्यांची देणी. सुप्रिया सुळे यांना 2019 मध्ये 55 लाख रुपयांची देणी होती. ही देणी किवा कर्ज बँकांची किंवा कोणत्याही वित्तीय संस्थांची नाहीत, तर ती वैयक्तिक स्वरूपाची देणी आहेत. सुप्रिया सुळे यांना हे देणं होतं ते पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांना. पार्थ पवार यांना 20 लाख रुपये तर सुनिता पवार यांना 35 लाख रुपये 2019 मध्ये सुप्रिया सुळे यांना देणं होतं. ते त्यांनी अद्याप दिलं नाही. हे आता त्यांच्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत जे शपथपत्रातून स्पष्ट झालं आहे.

खासदार अमोल कोल्हेंकडे किती संपत्ती?

खासदार अमोल कोल्हे यांचे सन 2022-23 या वर्षात 40 लाख 73 हजार इतका उत्पन्न होतं. ⁠त्यांच्याकडे चाळीस हजार रुपयांची रोख रक्कम आहे. ⁠बँकांमधील ठेवी, शेअर्स, पोस्टांमधील ठेवी, वाहने, सोन अशी मिळून अमोल कोल्हे यांच्याकडे एकूण 82 लाख 39 हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. एक पजेरो कार तर दुसरी बुलेट आहे. तर यांना बारा लाख रुपयांची येणी आहे⁠त

Lok Sabha Election 2024
Dharamraobaba Aatram: विजय वड्डेटीवार भाजपमध्ये प्रवेश करणार का?, पुरावे मागितले; आत्राम म्हणाले नार्को टेस्ट करा

अमोल कोल्हे यांची नारायणगाव येथे शेतजमीन आहे. जवळपास सात एकर ही शेतजमीन असून त्याचं बाजारमूल्य 84 लाख 56 हजार रुपये आहे. ⁠मुंबईत दोन नारायणगाव मध्ये दोन तर नाशिक येथे एक घर आहे सर्व घरं त्यांची सामायिक मालकीची आहेत. सात कोटी 29 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर त्यांच्यावर दोन कोटी 99 लाख रुपयांचा कर्ज देखील आहे

Lok Sabha Election 2024
Maharashtra Politics 2024 : बीड लोकसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट; मराठा आंदोलक उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com