Lok Sabha Election 2024 : अमेठीतून गांधी कुटुंबाकडून उमेदवार ठरला, स्मृती इराणींना देणार कडवी टक्कर

Amethi Lok Sabha Constituency : अमेठीवरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी मोठं विधान केलं आहे. ते अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
Lok Sabha Election 2024 : अमेठीतून गांधी कुटुंबाकडून उमेदवार ठरला, स्मृती इराणींना देणार कडवी टक्कर
Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election 2024

लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराला देशभर सुरुवात झाली आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवारांची घोषणाही करण्यात येत आहे. मात्र गांधी कुटुंबाने अमेठीतून अद्याप कोणत्याही उमेदवाराची घोषणा केलेली नाही. दरम्यान अमेठीवरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी मोठं विधान केलं आहे. ते अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. गांधी घराण्यातील कोणीतरी पुन्हा निवडणूक लढवायला हवी आणि आपण राजकारणात उतरलो तर अमेठीतून निवडणूक लढवावी, अशी अमेठीच्या जनतेची इच्छा आहे. गेल्या निवडणुकीत स्मृती इराणींना विजयी केल्याची खंत जनतेत आहे. त्यामुळे अमेठीच्या जनतेला पुन्हा एकदा गांधी घराण्यातील एका व्यक्तीला प्रचंड मतांनी विजयी करायचं आहे, असं रॉबर्ट वॉड्रा यांनी म्हटलं आहे.

अमेठीत जो कोणी खासदार असेल त्याने विकासावर लक्ष केंद्रित करावं आणि भेदभावाचे राजकारण करू नये. आज अमेठीची जनता चिंतेत आहे. कदाचित त्यांनी चुकीचा लोकप्रतिनिधी निवडला याचं दु:ख त्यांना होत असेल. गेल्या ५ वर्षात अमेठीचा विकास रखडला असताना इथल्या विद्यमान खासदार नेहरू-गांधी कुटुंबावर विनाकारण टीका करत असतात. त्यामुळे अमेठीच्या नावावर केवळ राजकारण केले जात असून विकासाबद्दल कोणी चक्कार शब्द काढत नसल्याच म्हणत त्यांनी स्मृती इराणींवर जोरदार टीका केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1999 पासून अमेठीशी संबंध

रॉबर्ट वाड्रा यांचे अमेठीशी 1999 पासून संबंध आहेत. त्यावेळी प्रियांकासोबत ते तिथल्या प्रचारात सहभागी झाले होते. राजकारणात त्यांचीही सुरुवात होती. त्यावेळी इथलं राजकारण वेगळ्या स्वरूपाचं होतं. त्यावेळी संजय सिंह होते. मला आठवतं प्रचारादरम्यान आम्ही रात्रभर पोस्टर्स लावायचो. कार्यकर्त्यांचा प्रोत्साहन द्यायचो.

Lok Sabha Election 2024 : अमेठीतून गांधी कुटुंबाकडून उमेदवार ठरला, स्मृती इराणींना देणार कडवी टक्कर
Maharashtra Politics 2024 : शरद पवार गटाची लोकसभेची दुसरी यादी जाहीर; भिवंडी, बीडमधून कोणाला मिळाली उमेदवारी?

अमेठीतील जनता शांतताप्रिय

रॉबर्ट वाड्रा म्हणाले, मला आठवतं, येथील लोक मला आजही संदेश पाठवतात. इथली परिस्थिती सांगतात. अमेठीची जनता सुरुवातीपासूनच सलोखा राखणारी आणि शांतताप्रिय आहे. त्यांचा हा स्वभाव आजही बदलेला नाही.काँग्रेस पक्षाने अद्याप अमेठीतून उमेदवार जाहीर केलेली नाही. अशा परिस्थितीत रॉबर्ट वाड्रा यांच्या विधानाला महत्त्व आलं आहे. रॉबर्ट वाड्रा अमेठीतून काँग्रेसचे उमेदवार असतील की नाही, याची चर्चा सध्या देशभर रंगली आहे.

Lok Sabha Election 2024 : अमेठीतून गांधी कुटुंबाकडून उमेदवार ठरला, स्मृती इराणींना देणार कडवी टक्कर
Maharashtra Lok Sabha Election : दीर-भावजय धाराशिवच्या आखाड्यात आमनेसामने; पारंपरिक प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com