राेहित पवार म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला नेता : अमाेल मिटकरी

Rohit Pawar Viral Video : निवडणूक आयोग किती दिवस बघ्याची भूमिका घेतं, हे बघुया! असेही राेहित पवार यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे. त्यास अमाेल मिटकरी यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
lok sabha election 2024 amol mitkari criticises rohit pawar on beed constituency video
lok sabha election 2024 amol mitkari criticises rohit pawar on beed constituency videoSaam Digital
Published On

- अक्षय गवळी

बीडच्या संदर्भातील आमदार रोहित पवार यांनी व्हायरल केलेला व्हिडिओ त्यांना कुणी दिला? याचा तपास करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. यासोबतच बबन गित्ते कुणाचे प्रतिनिधी होते? जर ते प्रतिनिधी नसताना मतदान केंद्रावर गेले असतील तर त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी असेही आमदार मिटकरी यांनी नमूद केले आहे. (Maharashtra News)

राेहित पवार यांनी एक्सवर ट्विट करुन बूथ ताब्यात घेऊन मतदान मारण्याचा हा नवा परळी पॅटर्न महाराष्ट्राला शोभत नाही. पंकजाताई तुम्ही कदाचित यामध्ये सहभागी नसालही, पण तुमचे बंधुराज कुठल्या पातळीला जाऊ शकतात हे कदाचित तुम्हालाही माहित नसेल असे धनंजय मुंडे यांचे नाव न घेता पवार यांनी टीका केली आहे. याबाबत चाैकशीची मागणी पवार यांनी निवडणुक आयाेगाला ट्विट करुन केली आहे.

lok sabha election 2024 amol mitkari criticises rohit pawar on beed constituency video
Bhandardara Fireflies Festival 2024: काजव्यांची चमचम पाहण्यास भंडारद-याला येणार आहात? जाणून घ्या नियम व अटी

महाराष्ट्रासारख्या राज्यात असे प्रकार घडवून आणण्याची हिम्मत येतेच कुठून? असे प्रकार करण्याची गरज पडतेच का ? सत्तेतून ही हिम्मत येत असेल तर मग ही लोकशाहीसाठी निश्चितच धोक्याची घंटा आहे. निवडणूक आयोगाने स्थानिक मंत्री महोदयासह स्थानिक प्रशासनाची चौकशी करावी. निवडणूक आयोग किती दिवस बघ्याची भूमिका घेतं, हे बघुया! असेही राेहित पवार यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राेहित पवार म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला नेता - मिटकरी
आमदार रोहित पवार यांच्या मागणीवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी निवडणूक आयोगाने व्हिडिआेची सत्यता पडताळून संबंधितांवर कारवाई करावी करावी अशी मागणी केली. दरम्यान, या सर्व गोष्टीला 4 जूनला निकालातून जनता उत्तर देणार असल्याचे आमदार मिटकरी यांनी म्हटले आहे. आमदार रोहित पवार म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला नेता असल्याचा टोला मिटकरींनी पवारांना लगावला.

Edited By : Siddharth Latkar

lok sabha election 2024 amol mitkari criticises rohit pawar on beed constituency video
Swargate Bus Stand: प्रवासी संतापले, स्वारगेट स्थानकातून बस नव्हे हाेड्या चालवा; चिखल राडाराेड्यामुळे एसटी कर्मचा-यांचे आराेग्य धाेक्यात

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com