Devendra Fadnavis Sabha in Madha
Devendra Fadnavis Sabha in MadhaSaam TV

Devendra Fadnavis in Madha: माढ्याला ठोकशाही अन् दहशतीतून मुक्त करणार; देवेंद्र फडणवीस मोहिते-पाटलांवर कडाडले

Madha Lok Sabha 2024: माढ्याला ठोकशाही आणि दहशतीतून मुक्त करणार, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते माळशिरस येथील जाहीर सभेत बोलत होते.

Devendra Fadnavis Sabha in Madha

मोहिते-पाटील घराण्याने आजवर अनेक लोकांच्या जमिनी बळकावल्या असून काही लोकांवर हल्ले आणि काहींची हत्या देखील केली आहे. मात्र, यापुढे हे सहन केले जाणार नाही. माढ्याला ठोकशाही आणि दहशतीतून मुक्त करणार, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते माळशिरस येथील जाहीर सभेत बोलत होते.

Devendra Fadnavis Sabha in Madha
PM Modi Sabha in Madha: ....म्हणून त्या नेत्याची इथून निवडणूक लढवण्याची हिंमत नाही; PM मोदी कुणावर बरसले?

माढा लोकसभा मतदारसंघाचे (Lok Sabha Election 2024) महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांनी आज माळशिरस येथे जाहीर सभा घेतली. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार भाषण करत सभेची सुरुवात केली. यावेळी त्यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कामाची तोंडभरुन कौतुक केलं. तसेच भाजपची साथ सोडून शरद पवार गटात दाखल झालेल्या मोहिते-पाटील घराण्यावर जोरदार निशाणा साधला.

"माढ्याला ठोकशाही आणि दहशतीतून मुक्त करणार"

मोहिते-पाटील घराण्याने अनेक लोकांवर हल्ले केले असून काहींची हत्या केली आहे. त्यांनी बऱ्याच जमिनी बळकावल्या आहेत. मात्र, यापुढे हे सहन केले जाणार नाही. मी माढा तालुक्याला मोहिते-पाटील यांच्या दहशतीतून मुक्त करणार आहे, असं फडणवीसांनी ठणकावून सांगितलं.

माढ्यात शरद पवार आणि मोहिते पाटील घराणे आपआपल्या पुढच्या पिढीसाठी एकत्र आले आहेत. माढ्यातील रामोशी समाज प्रामाणिक आहे. या समाजाचा वापर आणि अध:पतन करण्याचा प्रयत्न होत आहे. पण महायुती रामोशी आणि धनगर समाजाच्या पाठिशी उभी राहील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Devendra Fadnavis Sabha in Madha
Amit Shah Criticized On Congress: ओबीसींच्या आरक्षणात कॉंग्रेसची बाधा; अमित शहांचा गंभीर आरोप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com