Vishal Patil : उमेदवारी अर्ज माघारी घ्या अन्यथा निलंबित करणार; काँग्रेसकडून विशाल पाटील यांना कारवाईचा इशारा

Sangli Vishal Patil News : संजय राऊत यांनी बंडखोरी करणाऱ्या विशाल पाटील यांची काँग्रेसने हकालपट्टी करावी, अशी मागणी केली होती. यानंतर काँग्रेस विशाल पाटील यांना निलंबित करण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Sangli lok sabha constituency
Vishal Patil Saam tv
Published On

आवेश तांदळे, मुंबई

मुंबई : सांगलीत विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज भरल्याने ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या समोर मोठा पेच उभा राहिला आहे. यामुळे दोन दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी बंडखोरी करणाऱ्या विशाल पाटील यांची काँग्रेसने हकालपट्टी करावी, अशी मागणी केली होती. यानंतर काँग्रेस विशाल पाटील यांना निलंबित करण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सांगलीत विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे सांगलीतील राजकारण तापलं आहे. विशाल पाटील यांच्या भूमिकेमुळे सांगलीत इंडिया आघाडीसमोर मोठा पेच उभा राहिला आहे. विशाल पाटील यांच्या बंडखोरीनंतर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. सांगलीचे विशाल पाटील यांना काँग्रेस निलंबित करण्याची शक्यता आहे.

Sangli lok sabha constituency
Vasant More Property: आलिशान गाड्या, बाईक्स अन् कोट्यवधींचे कर्ज; १२वी पास 'वसंत तात्यां'ची संपत्ती किती?

विशाल पाटील यांनी काही दिवसांपूर्वी सांगलीत बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. यामुळे काँग्रेस कारवाई करण्याची शक्यता आहे. सोमवारपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्यास काँग्रेस कारवाई करण्याची शक्यता आहे. सांगलीत ठाकरे गटाने उमेदवार दिल्यामुळे विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. विशाल पाटील यांच्या भूमिकेवर ठाकरे गटाकडून टीका करण्यात आली होती.

Sangli lok sabha constituency
Saam EXCLUSIVE : 'साम'च्या वृत्तावर शिक्कामोर्तब! नाशिमधून हेमंत गोडसे हेच लोकसभा लढणार

विशाल पाटील यांच्या भूमिकेवर संजय राऊत काय म्हणाले?

संजय राऊत आज शनिवारी सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान संजय राऊत यांनी विशाल पाटील यांच्या भूमिकेवर भाष्य केलं. 'विशाल पाटील हे समजूतदार आहेत. वसंत पाटील यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आहे. त्यांच्या कुटुंबाशी संबंध का ठेवू शकत नाही? विशाल पाटील यांची भेट का घेऊ शकत नाही? विशाल पाटील आमचे शत्रू नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या मनात प्रेम आहे. विशाल पाटील यांच्या मनातही शिवसेनेविषयी प्रेम आहे , असे राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com