Vasant More Property: आलिशान गाड्या, बाईक्स अन् कोट्यवधींचे कर्ज; १२वी पास 'वसंत तात्यां'ची संपत्ती किती?

Vasant More Property: धंगेकर आणि मोहोळ यांच्यासोबतच पुणे लोकसभेचे सर्वात चर्चित उमेदवार म्हणजे वसंत तात्या मोरे. मनसेला रामराम ठोकून वंचित आघाडीकडून वसंत मोरे लोकसभेच्या रिंगणात उतरलेत.
Vasant More
Vasant MoreSaam Tv

सागर आव्हाड, पुणे|ता. २० एप्रिल २०२४

पुणे लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर तर महायुतीकडून मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये काँटे की टक्कर होणार आहे. परंतु धंगेकर आणि मोहोळ यांच्यासोबतच पुणे लोकसभेचे सर्वात चर्चित उमेदवार म्हणजे वसंत तात्या मोरे. मनसेला रामराम ठोकून वंचित आघाडीकडून वसंत मोरे लोकसभेच्या रिंगणात उतरलेत. काल वसंत मोरे यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांनी आपल्या संपत्तीचा उल्लेख केला आहे ज्यामधून त्यांच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता असल्याचे समोर आले आहे.

वसंत मोरेंची संपत्ती किती?

वसंत मोरे (Vasant More) यांच्याकडे अनेक गाड्या, सोने आणि चांदी अशी मालमत्ता असल्याचे त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे. त्यांच्याकडे चार कोटी १६ लाख ६७ हजार ३६४ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तर वसंत मोरे यांच्यावर तीन कोटी ४९ लाख २३ हजार ४३९ रुपयांचे, पत्नीवर ८ लाख ८९ हजारांचे आणि मुलगा रुपेश मोरेवर ४७ हजार १४७ रुपयांचे कर्ज आहे.

वसंत मोरेंचे शिक्षण बारावीपर्यंत झाले असून त्यांच्यावर सात गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडे इनोव्हा, ऑडी आणि ॲम्बेसिडर या चारचाकी गाड्यांचा ताफा; बुलेटसह सहा दुचाकी आणि एक ट्रक आहे. सोबतच त्यांच्याकडे ७० ग्रॅम आणि पत्नीकडे २७० ग्रॅम सोने आहे.

Vasant More
Vishal Patil : उमेदवारी अर्ज माघारी घ्या अन्यथा निलंबित करणार; काँग्रेसकडून विशाल पाटील यांना कारवाईचा इशारा

निवडणूक लढायला वंचितकडून पैसे...

"धंगेकरांचा कार्यकर्ता मला म्हटला मैने आपको (वसंत मोरे को) दिल मे रखा है. मी मनसेत शुन्यापासून सुरुवात केली. आताही वंचित बहुजन आघाडीत शुन्यापासून सुरुवात करतोय. मी कायम माझा फ्लॅट विकून निवडणूक लढलो पण मला वंचितने निवडणूक लढायला पैसे दिले," असे वसंत मोरे म्हणाले.

Vasant More
Transgender Wedding : चर्चा आगळ्यावेगळ्या लग्न सोहळ्याची; युवकाने तृतीयपंथीयाशी बांधली गाठ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com