Maharashtra Loksabha: नागपूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द, काय आहे प्रकरण?

Ramtek Lok Sabha Election : उमेदवारी अर्जासोबत जोडलेलं जात प्रमाणपत्र वैध नसल्याचं कारण देत रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला.
Rashmi Barve
Rashmi Barve

(पराग ढोबळे, नागपूर)

Rashmi Barve Loksabha Candidature Application Canceled :

नागपूरमध्ये काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलाय. लोकसभा निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द केलीय. काँग्रेसचे उमेदवारी रद्द झाल्यानं काँग्रेससोबत महाविकास आघडी अडचणीत आलीय. जात पडताळणी समितीने रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द केल्याने त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आलीय. (Latest News)

रश्मी बर्वे याचे पती श्यामकुमार बर्वे यांचा एबी फॉर्म डमी जोडलेला फार्म वैध ठरल्याने तेच रामटेकमधून काँग्रेसचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. प्रमाणपत्र रद्द झाल्याने नामांकन अर्जाची छाननीत जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सुनावणी घेतली.याचिकाकर्ते सुनील साळवे आणि रश्मी बर्वे यांच्या बाजू ऐकून घेतली. त्यानंतर जात वैधता समितीच्या जात वैधता प्रमाणपत्र रद्द केल्याने उमेदवारी भरण्यास अपात्र ठरवत उमेदवारी रद्द करण्यात आलीय.

सकाळी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं आहे. महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून रश्मी बर्वे यांनी बुधवारी रामटेकमधून लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. रश्मी बर्वे यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र बनावट आहे, असा आरोप विरोधकांनी केला होता. यावर हायकोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आली होती.

महायुतीकडून आक्षेप

काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांच्या जात वैद्यता प्रमाणपत्रावर महायुतीसह अपक्ष उमेदवारांनी आक्षेप घेतला.रश्मी बर्वे यांनी जात वैधता प्रमाणपत्र तयार करताना खोटी कागदपत्रं जोडली, त्यामुळे त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र कसे खोटे असल्याचा आरोप विरोधकाकडून करण्यात आला होता. महायुतीच्या नेत्यांनी त्यांचा आरोप कसा खरा आहे हे त्यांनी निवडणूक आयोग अधिकाऱ्यांना पटवून दिलं. त्यामुळे रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज टिकतो की बाद होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं.

दरम्यान निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे ऐन निवडणुकीच्या हंगामात हा निर्णय समोर आल्याने आता बर्वे यांच्यासह काँग्रेस आणि महाविकास आघाडीची मोठी अडचण झाली आहे. जात वैधता प्रमाणपत्रावर घेतलेल्या आक्षेपवर बर्वे यांनी कायदेशीर लढाई लढण्याचा निश्चय केला होता, मात्र अधिकाऱ्यांनी त्यांना धक्का देत त्यांची उमेदवारी रद्द केलीय.

दरम्यान रश्मी बर्वे यांचे पती शाम बर्वेंचा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरण्यात आल्यामुळे काँग्रेसचं टेन्शन थोडं कमी झालंय. रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेल्या किशोर गजबियेंनी आपण प्रशासकीय अधिकारी असल्याने रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र बाद ठरणार असल्याचा इशारा काँग्रेसला दिला होता. मात्र तरीही पक्षाने बर्वें यांनाच उमेदवारी दिली.

Rashmi Barve
Maharashtra Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यात ७१ उमेदवारांचे अर्ज अपात्र

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com