Chhatrapati Sambhaji Nagar Election: ३० लाख ६७ हजार ७०७ मतदार बजावणार मतदानाचा अधिकार

Loksabha Election : संभाजीनगर जिल्ह्यात ३०८५ मतदान केंद्र असून त्यात जालना लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेले १०४५ मतदान केंद्र हे ६१८ ठिकाणी आहेत. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात २०४० मतदान केंद्र ९७६ ठिकाणी आहेत. जिल्ह्यात ३० लाख ६७ हजार७०७ मतदार आहेत.
Chhatrapati Sambhaji Nagar Election:  ३० लाख ६७ हजार ७०७ मतदार बजावणार मतदानाचा अधिकार
Chhatrapati Sambhaji Nagar ElectionSaam Digital
Published On

छत्रपती संभाजीनगर : राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यास भेट देऊन निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त मनोज लोहिया सह अधिकारी उपस्थित होते.

संभाजीनगर जिल्ह्यात ३०८५ मतदान केंद्र असून त्यात जालना लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेले १०४५ मतदान केंद्र हे ६१८ ठिकाणी आहेत. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात २०४० मतदान केंद्र ९७६ ठिकाणी आहेत. जिल्ह्यात ३० लाख ६७ हजार७०७ मतदार आहेत. त्यात जालना मतदारसंघात १० लाख ६,४८७ तर छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात २० लाख ६१ हजार २२० मतदार आहेत.

जिल्ह्याला ६१२० मतदान यंत्रे, २०४० कंट्रोल युनिट, २०४० व्हिव्हिपॅटची आवश्यकता आहे. ते सर्व उपलब्ध असून सद्यस्थितीत ७३४१ मतदान यंत्रे उपलब्ध आहेत. २४४५ कंट्रोल युनिट व २६४९ व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत. त्यातील उर्वरित यंत्रे ही राखीव ठेवण्यात आली आहेत. मतदान प्रक्रियेसाठी १७ हजार ७४० मनुष्य बळाची गरज असून २० हजार ५२४ कर्मचारी प्रशिक्षण घेऊन सज्ज आहेत, अशी माहिती देण्यात आली. दरम्यान औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात, औरंगाबाद पूर्व, गंगापूर, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम, वैजापूर आणि कन्नड असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत.

छत्रपती संभाजीनगर आणि जालनामध्ये शिंदे गट आणि भाजपची प्रतिष्ठापणाला लागलीय. छत्रपती संभाजीनगरमध्ये चौरंगी लढत होणार आहे. येथे शिवसेनेचे दोन उमेदवार रिंगणात आहेत. एक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे. ही शिवसेना महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहे. तर दुसरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आहे. ही शिवसेना महायुतीतील घटकपक्ष आहे.

शिंदे गटाचे नेते आणि पैठणचे आमदार संदिपान भुमरे हे एकमेंकांविरुद्धात लढत आहेत. तसेच रिंगणात ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एआयएमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील आणि वंचित बहुजन आघाडीकडून अफसर खानही मैदानात आहेत. एमआएमचे नेते खासदार इम्तियाज जलील, शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संदिपान भुमरे हे तीनही नेते तुल्यबळ असल्याचे मानलं जात आहे.

पण आता मतदार कोणाच्या पारड्यात विजय देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. तर जालन्यात यंदा रावसाहेब दानवेविरुद्ध काँग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक असलेला मराठा सामाज कुणाचा पारड्यात मत टाकतो हे पाहावं लागेल.

Chhatrapati Sambhaji Nagar Election:  ३० लाख ६७ हजार ७०७ मतदार बजावणार मतदानाचा अधिकार
Jalna lok sabha: कोण होणार जालन्याच्या खासदार? भाजपाचा विजयी रथ काँग्रेस रोखणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com