बारामती लोकसभा मतदार संघातून (Baramati Loksabha Election 2024) महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहिलेल्या सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचारार्थ महायुतीची आज पुण्यामध्ये जाहीर सभा झाली. या सभेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी 'नवीन इतिहास घडेल, सुनबाई दिल्लीला जातील.', असा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीसह राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.
देवेंद्र फडणवीस यांनी यासभेदरम्यान सांगितले की, 'बारामतीकरांच्या मनामनामध्ये सुनबाई सुनेत्रा पवार आहेत. बारामतीचा फैसला आजच्या सभेनेच केला आहे. बारामतीला आणि वहिनींना कुणीच थांबवू शकत नाही. नवीन इतिहास घडेल आणि सुनबाई दिल्लीला जातील. अजित पवारांनी बारामतीसाठी मेहनत घेतली आहे. बारामतीच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे.'
तसंच, 'ही लढाई पवारसाहेब विरुद्ध दादा अशी नाही किंवा सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी नाही. ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. ही निवडणूक मोदी विरुद्ध गांधी अशी आहे. देशाचा नेता निवडण्यासाठी ही निवडणूक आहे. कोणच्या हातामध्ये आपण भारत देश द्यायचा याचा निर्णय घेण्यासाठीची ही निवडणूक आहे. आपण देणारे मत कोणाला द्यायचे आहे मोदींना की राहुल गांधींना हे ठरवायचे आहे. पण विकासाला मत द्यायचे की विनाशाला मत द्यायचे हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे.', असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला केले आहे.
महायुतीच्या सभेमध्ये सुनेत्रा पवार यांनी सांगितले की, 'पाठींबा द्यायला आणि मनोबल वाढविण्यासाठी आला त्याबद्दल सर्वांचे आभार. देशाच्या विकासाला प्रेरित होऊन आपण एकत्रित आलो आहोत. मोदी यांच्याविषयी सर्वांना विश्वास आहे. मोठ्या वेगाने विकास होत आहे. त्यामूळे जनतेच्या मनात मोदी आणि मोदीच आहेत. अजितदादा यांच्यामुळे बारामतीचा विकास झाला. गेल्या १० वर्षात विकास कामे केली आहेत. अनेक विकास काम केली आणि करण्याचा प्रयत्न केला. आजपर्यंत जे घेतलं ते यशस्वी करून दाखवलं आहे.' तसंच, 'उमेदवारी देऊन माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल आभार. घड्याळाला मत म्हणजे मोदींना मत यावर जनता विश्वास ठेवेल. वेळ बदलली असली तरी चिन्ह तेच आहे. जास्तीत जास्त मताने मला निवडून द्यावे.', असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.
अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी सांगितले की, 'आज खऱ्या अर्थाने बारामती आणि राज्याच्या आणि देशाच्या राजकारणासाठी महत्त्वाचा दिवस आहे. अनेकांना आश्चर्य वाटत असेल प्रफुल्ल पटेल या मंचावर आज कसे? मी आणि अजित पवार यांनी संसदीय राजकारणात एकत्रित सुरुवात केली. त्यानंतर पवारसाहेब देशाचे संरक्षणमंत्री झाले आणि अजित पवार हे पवार साहेबांच्या जागी बारामतीचे आमदार झाले. आम्ही एका वटवृक्षाखाली कामाची सुरुवात केली.'
तसंच, 'मागील काही वर्षांपासून या भागात आणि बारामतीच्या विकासामध्ये अजित पवार यांचे मोठं योगदान आहे. आम्ही एका रात्रीत गेलो अस नाही.अनेक वर्ष हे सुरू होतं. अनेक वेळा भूमिका कधी मागे कधी पुढे होती. मात्र वाद्याला पक्का असणारा नेता आहे. अजित दादासारखा कामाचा माणूस आहे. कोणी नवीन नाही. सगळेच नवीन असतात. दिल्लीत आमची साथ देणार आहोत. व्यक्तीला संधी मिळाली तर काम दिसतं. त्यामुळे आज साथ द्यावी लागेल.' असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.