Ajit Pawar News: बनवाबनवी सुरू आहे; हलक्या कानाचे राहू नका.. अजित पवारांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

Pune Breaking News: महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राहणार उपस्थित होते.
Baramati Loksabha Election  Ajit Pawar Meeting
Baramati Loksabha Election Ajit Pawar Meeting

सचिन जाधव, पुणे|ता. १८ एप्रिल २०२४

आज बारामती लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. यावेळी महायुतीकडून आज पुण्यात मोठं शक्ती प्रदर्शन केले गेले. महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राहणार उपस्थित होते. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक देशासाठी महत्वाचे असल्याचे सांगत मतदारांना साद घातली.

काय म्हणाले अजित पवार?

"ही गावकी भावकीची निवडणूक नाही.ही देशाची निवडणूक आहे, देशात विकास कोण करेल. पंतप्रधान मोदी यांनी तडफदार आक्रमकपणे विकासकामे केली. आता आपली अर्थव्यवस्था तिसऱ्या नंबर आणण्यासाठी काम करत आहेत, असे म्हणत देशाचे भवितव्य घडवणारी निवडणूक आहे," असे अजित पवार यावेळी म्हणाले.

कार्यकर्त्यांना कानमंत्र..

"ही निवडणूक मोदींविरुद्ध राहुल गांधी (Rahul Gandhi) अशी आहे. उगाच भावकीची निवडणूक केली जाते. ही निवडणूक देश पातळीवरची आहे. अजिबात हलक्या कानाचे राहू नका, बनवाबनवी सुरू आहे, ऐकू नका. विकास पुरुष या नात्याने मोदी याचा रस्ता पकडला आहे आपल्याला त्याचा फायदा करून घ्यायचा आहे.." असा कानमंत्रही अजित पवार यांनी यावेळी दिला.

Baramati Loksabha Election  Ajit Pawar Meeting
India Population: भारताची लोकसंख्या १४४ कोटी; चीनलाही मागे टाकले, अहवालातून आकडेवारी समोर

"आम्ही पुरंदर दौंड इंदापूरसाठी पाणी आणण्यासाठी प्रयत्न चालू आहे. कोणाचेही पाणी चोरलं जाणार नाही सगळ्यांना हक्काने पाणी दिले जाईल. कोणाचं कोणाला दिला जाणार नाही, हक्काचं पाणी सर्वांना मिळणार आहे. बारामतीमध्ये विरोधी खासदार होता म्हणून निधी आला नाही. त्यामुळे आता विकासासाठी सुनेत्रा पवार यांनी निवडून द्या," असे अजित पवार यावेळी म्हणाले.

Baramati Loksabha Election  Ajit Pawar Meeting
Narayan Rane : भाजपकडून १३ वी यादी जाहीर; रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघामधून नारायण राणेंना उमेदवारी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com