Loksabha Election 2024 : अंबादास दानवे शिंदे गटात जाणार आणि लोकसभा लढवणार? चर्चांवर म्हणाले...

Politcal news : अंबादास दानवे यांना महायुतीत सहभागी करुन घेण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाचे प्रयत्न सुरू असल्याची देखील माहिती मिळत आहे
Ambadas Danve
Ambadas DanveSaam TV

रामू ढाकणे | छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News :

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. अंबादास दानवे यांना महायुतीत सहभागी करुन घेण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाचे प्रयत्न सुरू असल्याची देखील माहिती मिळत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अंबादास दानवे यांना महायुतीत घेऊन संभाजीनगर लोकसभेसाठी उभं करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिंदे गट आणि भाजपकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना वैतागून अंबादास दानवे यांनी फोन बंद केले असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांकडून मिळत आहे. (Latest Marathi News)

Ambadas Danve
Loksabha Election: महाविकास आघाडीपासून प्रकाश आंबेडकर 'वंचित'च राहणार? उद्या स्पष्ट करणार भूमिका

अंबादास दानवे यांनी फोन बंद करून भेटीगाठी सुरू केल्याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ते म्हणत असतील येणार, मात्र मी सांगतो मी कुठेही जाणार नाही. मी उद्धव ठाकरे यांचा कार्यकर्ता आहे. मात्र, आपण शिंदे गट किंवा भाजपात जाणार नसल्याचं अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं.

Ambadas Danve
Sanjay Raut: आमचं जागावाटप महाराष्ट्रात, दिल्लीची गुलामी करावी लागत नाही; संजय राऊतांचा टोला

अंबादास दानवे यांनी म्हटलं की, आज यादी जाहीर होईल त्यात माझं नाव असणे आणि नसणे हे महत्वाचे नाही. ज्याला तिकीट मिळाले त्याचं काम करेल. प्रकाश आंबेडकर अजूनही आमच्या सोबत आहेत, असंही अंबादास दानवे यांनी म्हटलं.

संजय राऊतांचं महायुतीवर टीकास्त्र

शिवसेनेची पहिली यादी तयार आहे. दिवसभरात ती यादी आम्ही प्रसिद्धीला देऊ. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक आहे. महाविकास आघाडीकडून बाळासाहेब आंबेडकरांना चार जागांचा दिलेला प्रस्ताव अजूनही कायम असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

पूर्वी जागावाटप असेल तर मातोश्रीवर बैठका व्हायच्या. आता यांना दिल्लीत जावं लागतं. पवारांना दिल्लीत जाऊन बसावं लागतं. छत्रपती उदयनराजे भोसले यांना दिल्लीत जावं लागतं, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com