Prakash Ambedkar-Mahavikas Aghadi
Prakash Ambedkar-Mahavikas AghadiSaam Tv

Loksabha Election: महाविकास आघाडीपासून प्रकाश आंबेडकर 'वंचित'च राहणार? उद्या स्पष्ट करणार भूमिका

Vanchit Aaghadi Mahavikas Aaghadi: वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला २६ मार्च पर्यंतचा अंतिम अल्टीमेटम दिला होता. मात्र अद्यापही महाविकास आघाडीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे.
Published on

गिरीश कांबळे, मुंबई|ता. २६ मार्च २०२४

Maharashtra Politics News:

महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या जागा वाटपाचा आणि युतीचा तिढा काही सुटत नसल्याचे दिसत आहे. वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला २६ मार्च पर्यंतचा अंतिम अल्टीमेटम दिला होता. मात्र अद्यापही महाविकास आघाडीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे उद्या प्रकाश आंबेडकर आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीबरोबरची बोलणी जवळपास फिसकटली असल्याचे बोलले जात आहे. याबाबत उद्या प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. अकोल्यामधून ते पत्रकारांशी संवाद साधणार असूनया वेळी लोकसभा मतदारसंघातील काही उमेदवार जाहीर करण्याचीही शक्यता आहे.

वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aaghadi) महाविकास आघाडीने ४ जागांचा प्रस्ताव दिल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. मात्र हा प्रस्ताव वंचितने फेटाळला असून नव्याने कोणतीच चर्चा वंचित आणि मविआमध्ये झाली नाही. त्यामुले दोघांची बोलणी फिस्कटली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Prakash Ambedkar-Mahavikas Aghadi
Loksabha Election: शिवतीर्थावर धडाडणार प्रचाराच्या तोफा! शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी 'राजकीय' रस्सीखेच; पालिकेकडे अर्ज दाखल

दरम्यान, महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aaghadi) सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर यांना एकूण चार जागांचा प्रस्ताव दिला आहे तो कायम आहे. त्या संदर्भात अजून काही चर्चा सुरू आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर वंचित आघाडीसोबत अद्यापही चर्चा सुरू आहेत. चर्चा थांबलेली नाही.. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे उद्या प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Latest Marathi News)

Prakash Ambedkar-Mahavikas Aghadi
Solapur : सोलापूरमध्ये तापमानाचा पारा वाढला, वाढत्या उष्म्यामुळे नागरिक हैराण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com