Ahmednagar Politics: भाजपला मोठं खिंडार पडणार? शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत

Ahmednagar Lok Sabha Election: ऐन लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना भाजपमध्ये नाराजीनाट्य सुरु झालंय. अहमदनगरमध्ये भाजपांतर्गत वाद उफाळून आला आहे.
Ahmednagar Lok Sabha Election
Ahmednagar Lok Sabha ElectionSaam TV

Ahmednagar Lok Sabha Constituency

ऐन लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना भाजपमध्ये नाराजीनाट्य सुरु झालंय. अहमदनगरमध्ये भाजपांतर्गत वाद उफाळून आला आहे. सुजय विखे पाटील यांना पुन्हा लोकसभेचं तिकीट दिल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. याच नाराजीतून शेकडो कार्यकर्ते तसेच पदाधिकारी भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. (Breaking Marathi News)

Ahmednagar Lok Sabha Election
Aaba Bagul : आबा बागुल पुण्यात काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत? २ दिवसांत निर्णय जाहीर करणार

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावचे जवळपास १०० कार्यकर्ते आणि पदाधिकारी सामूहिक राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. स्थानिक पातळीवरील राजकारण, नगर दक्षिणचे खासदार सुजय विखेंना पुन्हा देण्यात आलेली लोकसभेची उमेदवारी राजीनाम्यामागील कारण असल्याची माहिती आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्राद्वारे कार्यकर्त्यांनी आपली नाराजी कळवली आहे. आज थोड्याच वेळात भाजपच्या प्रदेश कार्यालयाबाहेर सामूहिक राजीनामे देण्याचा पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी इशारा दिला आहे. त्यामुळे अहमदनगरमध्ये भाजपला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीकरीता विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना अहिल्यानगर लोकसभा मतदार संघ ३७ उमे‌द्वारी दिल्याने भारतीय जनता पार्टीची नगर दक्षिण जाग ही धोक्यात येवू शकते. खासदार निवडून गेल्यानंतर त्यांचा मतदार संघाशी संपर्क मोठयाप्रमाणात तुटला आहे, असं भाजप नेते सुनील रासने यांनी म्हटलं आहे.

नागरीकांचे, कार्यकत्यांचे फोन न उचलने, समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून न घेता त्याला सुमार दर्जाचा सल्ला देणे. पार्टी म्हणजे मी, मी म्हणजे मतदार संघातील जनता असे म्हणून जनतेला, मतदाराला गृहित धरणे, असे काम खासदार विखे यांनी केल्याचा आरोप रासने यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजप ४०० जागा पारही करेल. मात्र, नगर-दक्षिणची जागा नसणार याचे दुःख मतदार संघात प्रत्येक कार्यकत्याला वाटत आहे. त्यामुळे या उमेद्‌वारीच्या निषधार्थ मी माझ्या पक्षाने दिलेल्या पदांचा राजीनामा देत आहोत. पक्षाचा प्राथनिक सदस्य राहुन आम्ही निष्टावंत म्हणून भविष्यात पक्ष शुद्धिकरणासाठी काम करत राहणार आहोत, असंही रासने यांनी स्पष्ट केलंय.

Ahmednagar Lok Sabha Election
Madha Loksabha: माढ्यात मोठ्या घडामोडी! जयकुमार गोरेंचे बंधू शेखर गोरे शरद पवारांच्या भेटीला; महायुतीचं टेन्शन वाढणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com