Zinc Deficiency : झिंकच्या कमतरतेमुळे होऊ शकतात शरीरावर परिणाम, ही लक्षणे दिसल्यास वेळीच व्हा सावध

Zinc Deficiency Causes : शरीरात झिंकची कमतरता झाल्यास अनेक रोगांचा धोका वाढतो.
Zinc Deficiency
Zinc DeficiencySaam Tv
Published On

Zinc Deficiency Symptoms :

निरोगी आरोग्यासाठी आपल्या शरीराला पोषक तत्वांची आवश्यकता असते. शरीरामध्ये कोणत्याही व्हिटॅमिन्स अंत्यत आवश्यक आहेत. शरीरात याची कमतरता झाल्यास अनेक रोगांचा धोका वाढतो.

शरीरासाठी जितके व्हिटॅमिन्स दरजेचे आहे तितकेच झिंक देखील गरजेचे आहे. झिंक हे शरीरासाठी अंत्यत महत्त्वाची भूमिका बजावते. शरीरात झिंकची कमतरता जाणवल्यास शरीर आपल्याला संकेत देतात जाणून घेऊया त्याबद्दल ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. केसगळती

झिंकच्या कमतरतेमुळे केसगळती (Hair falls) सुरु होते. यामुळे केस तुटू देखील लागतात. तसेच केसांची नैसर्गिक वाढ खुंटते. यामुळे टक्कल पडण्याचा धोका वाढतो.

2. जखम लवकर बरी होत नाही

रक्त गोठण्यासाठी झिंक (Zinc) आवश्यक आहे. याच्या कमतरतेमुळे दुखापत झाल्यास रक्तस्त्राव लवकर थांबत नाही. झिंकच्या कमतरतेमुळे जखमा बऱ्या व्हायला वेळ लागतो. यामुळे संसंर्गाचा धोका वाढतो.

Zinc Deficiency
Hair Falls Remedies : केस पातळ झाले, प्रमाणापेक्षा जास्त गळतात? हा हेअर मास्क ट्राय करा, महिन्याभरात मिळेल रिजल्ट

3. पुरळ येणे

झिंकची कमतरता झाल्यास त्वचेवर पुरळ येऊ लागतात. अचानक चेहऱ्यावर मुरमे किंवा एक्जिमा सारख्या समस्या दिसू लागल्यास झिंकच्या कमतरता लक्षणे दिसू शकतात.

4. वजन कमी होणे

झिंकच्या कमतरतेमुळे अचानक वजन कमी (Weight Loss) होते. पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे वजनही कमी होते. हे शरीरासाठी आरोग्यदायी नाही. यामुळे इतर आजार होण्याची शक्यता असते.

5. दृष्टी धूसर होणे

झिंकच्या कमतरतेमुळे डोळ्यांना त्रास होऊ शकतो. ज्यामुळे धुसर दिसू लागते. डोळ्यांच्या रेटिनासाठी झिंक आवश्यक आहे. याच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा येतो.

Zinc Deficiency
Air Pollution Side Effects : वाढत्या प्रदूषणाचा फुफ्फुसावर होतोय परिणाम, डाएटमध्ये आजच सामील करा हे ड्रिंक्स

6. भूक न लागणे

झिंकच्या कमतरतेमुळे भूक न लागण्याची समस्या देखील होते. अचानक वजन कमी होण्याचे हे देखील एक कारण आहे.

7. वाढ खुंटणे

लहान मुलांमध्ये झिंकची कमतरता दिसू लागल्यास मुलांची वाढ खुंटते. तसेच मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावरही परिणाम होतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com