

PPF, सीनियर सिटीजन्स सेविंग्स स्कीम (SCSS) आणि नेशनल सेविंग्स सर्टिफिकेट (NSC) यांसारख्या लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. त्यांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन आधारकार्ड जमा करावा लागेल.
जर त्यांनी असे न केल्यास त्यांनी गुंतवणूक केलेले बँक (Bank) खाते फ्रीज केले जाईल. आधार कार्ड जमा केल्यानंतरच बँक खाते अनफ्रीज होईल. वित्त मंत्रालयाने PPF, NSC आणि इतर बचत योजनांसाठी आधार आणि पॅन कार्ड अनिवार्य केले आहे. सध्याच्या गुंतवणूकदारांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.
मंत्रालयाने 31 मार्च 2023 रोजी यासंदर्भात अधिसूचना जारी केली होती. यानुसार, जर एखाद्याचे खाते चालू असेल आणि त्यांनी लेखा कार्यालयात आधार क्रमांक सादर केला नसेल, तर त्याला सहा महिन्यांच्या आत हे करावे लागेल. त्यांना दिलेला सहा महिन्यांचा कालावधी 30 सप्टेंबर 2023 रोजी संपेल.
जर तुम्ही 30 सप्टेंबरपर्यंत लेखा कार्यालयात आधार जमा केला नसेल तर तुमचे खाते इनएक्टिव होईल. तुमची पोस्ट ऑफिसची गुंतवणूक खाते फ्रीज झाले तर तुम्ही काय करू शकता...
कमवलेले व्याज तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही.
तुम्ही पीपीएफ किंवा सुकन्या समृद्धी खात्यांमध्ये पैसे (Money) जमा करू शकणार नाही.
मुदतपूर्तीची रक्कम गुंतवणूकदाराच्या बँक खात्यात जमा होणार नाही.
स्मॉल सेविंग्स स्कीम्स म्हणजे काय?
स्मॉल सेविंग्स स्कीम्सना पोस्ट ऑफिस योजना असेही म्हणतात. यामध्ये पैसे गुंतवण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमचे पैसे सुरक्षित राहतात आणि तुम्हाला चांगले व्याजही मिळते. काही योजनांमध्ये कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभही उपलब्ध आहे.
पोस्ट ऑफिस नऊ बचत योजना ऑफर (Offer) करते. यामध्ये बचत खाते, आवर्ती ठेव खाते, वेळ ठेव खाते, मासिक उत्पन्न योजना खाते, ज्येष्ठ नागरिक बचत योजना खाते, पीपीएफ खाते, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र आणि सुकन्या समृद्धी यांचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.