Home clean in Monsoon: पावसाळ्यात घरात कुबट वास येत आहे? मग या टिप्स नक्की फॉलो करा

बाहेर चिखल आणि थंड वातावरण असल्याने घरात स्वच्छता असणे गरजेचे आहे.
Home clean in Monsoon
Home clean in MonsoonSaam TV
Published On: 

Home Dry in the Rainy Season: पावसाळा सुरु झाला की तापलेल्या उन्हावर पाण्याचे थेंब पडतात आणि मातीचा सुगंध दरवळतो. मातीचा वास संपूर्ण घरात देखील पसरतो. रिमझीम पावसाचे काही दिवस गेल्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात होताच घरात कपडे सुकवण्यासाठी अनेक अडचणी येतात. अशात घरामध्ये कुबट वास देखील येतो. त्यामुळे असा वास येऊनये यासाठी आज काही टिप्स जाणून घेऊ. (Latest Marathi News)

पावसात हवेत गारवा आणि आद्रता असते. त्यामुळे घरात माश्या भीनभीनतात. तसेच किचनमध्ये माश्या देखील येतात. पावसाळा सुरु होताच घरात चमचमीत भजी आणि गरम पदार्थ बनवण्यास सुरुवात होते. बाहेर चिखल आणि थंड वातावरण असल्याने घरात स्वच्छता असणे गरजेचे आहे. अन्यथा घराला कुबट वास येण्यास सुरुवात होते.

Home clean in Monsoon
Father's Day Special : मुलीच का असतात बाबांच्या लाडक्या? बाप-लेकिच्या सुंदर नात्याचं रहस्य जाणून घ्या

घरात वाईप्स वापरा

प्रत्येक घरामध्ये फरशीपासून ते किचनपर्यंत सर्व काही स्वच्छ करण्यासाठी विविध प्रकारचे कपडे ठेवण्यात येतात. पावसाळ्यात हे कपडे पटकन सुकत नाहीत. त्यामुळे असे कपडे वापरणे टाळावे. त्या ऐवजी जर तुम्ही वाईप्सचा वापर कराल तर तुम्हाला कापड वाळवण्याची गरज पडणार नाही. वाईप्सने किचन साफ केल्यावर ते धुताना कोणतीही अडचण येत नाही.

वायपर

प्रत्येकाच्या घरात वायपर असतेच. उन्हाळ्यात आपण त्याचा फारसा वापर करत नाही. किचनमध्ये भांडी साप करणे किंवा अन्या काही काम केल्यावर किचनच्या आजुबाजूला पाणी साचते. उन्हाळ्यात हे पाणी सहज वाळून जाते. मात्र पावसाळ्यात तसं होत नाही. पाणी तसंच राहिल्याने किचनमध्येही ओलावा राहून कुबट वास येण्यास सुरुवात होते.

Home clean in Monsoon
Belly Fat Exercise : पोटाची चरबी कमी करायची आहे ? ऑफिस चेअरवर बसून असा करा व्यायाम, आठवड्याभरात मिळेल रिजल्ट

धुतलेले कपडे लवकरात लवकर सुकवा

पावसाळा आणि बाहेर थंडी असल्याने अनेक व्यक्ती पाण्यात काम करण्याचा कंटाळा करतात. अशात कपडे धुवून ती तशीच ठेवली आणि पूर्ण सुकली नाही तर त्यांचा कुबट वास येण्यास सुरुवात होते. पावसाळ्यात घरातच कपडे सुकवायचे असतात. त्यामुळे फॅन फास्ट ठेवावा लागतो. थंडीमुळे काही जण फॅन बंद करुन ठेवतात. मात्र यामुळे कपडे सुकत नाहीत आणि घरात वास येऊ लागतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.