
Edited by - अर्चना चव्हाण
वर्षातील सर्वात मोठा आणि मुख्य सण, ख्रिसमस जवळ येत आहे. हा सण ख्रिश्चन धर्माशी संबंधित आहे परंतु भारतासह जगभरातील लोक मोठ्या उत्साहाने साजरा करतात. ख्रिसमस २५ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा सण साजरा करण्यासाठी लोक घरात ख्रिसमस ट्री सजवतात आणि केक कापून पार्टी करतात. भारतात ख्रिसमसनिमित्त सुट्टी असते. ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये, लोक त्यांच्या मित्र आणि कुटुंबासह बाहेर जातात. यावेळी नाताळ बुधवारी आहे. जर तुम्हाला ऑफिस किंवा कॉलेजमधून सुट्टी मिळत असेल, तर तुम्ही ख्रिसमसपासून नवीन वर्षापर्यंत लांबच्या प्रवासाची योजना आखू शकता. एक दिवस सुट्टी असल्यास ख्रिसमसच्या दिवशी लहान आणि जवळच्या ठिकाणी जाण्याचा विचार करा.
१.माउंट अबू
जर तुम्ही दिल्ली किंवा राजस्थान जवळ राहत असाल तर तुम्ही ख्रिसमसच्या सुट्टीत माउंट अबूला जाऊ शकता. राजस्थानमधील हे एकमेव हिल स्टेशन आहे, जिथे हिवाळ्याच्या काळात देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येतात. वाळवंटातील हे एकमेव हिल स्टेशन आहे. येथे तुम्ही वन्यजीव छायाचित्रण करू शकता आणि हिंदू देवी-देवतांच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट देऊ शकता.
२. नैनिताल
दिल्ली ते नैनिताल हे अंतर अंदाजे २९१ किमी आहे. ६ तासांचा प्रवास करून तुम्ही नैनितालला पोहोचू शकता. तुम्ही इकडे नैनी तलावात बोटिंगचा आनंद घेऊ शकता. मॉल रोडला, चर्च आणि इतर नैसर्गिक ठिकाणांना भेट देऊ शकता. तुम्ही एका दिवसात या सर्व गोष्टींना भेट देऊ शकता आणि रात्री परत येऊ शकता.
३. नीमरणा किल्ला
ख्रिसमस दरम्यान तुमच्या एक दिवसाच्या सुट्टीत नीमराना किल्ल्याला भेट देण्याची योजना करा. जयपूरचे हे हेरिटेज रिसॉर्ट पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. येथे तुम्ही सुंदर वास्तुकला पाहू शकता आणि आयुर्वेदिक स्पा चा आनंद देखील घेऊ शकता. उंट राइड, विंटेज कार राइड आणि झिप लाइनिंगचा आनंद घेता येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.