Yoga Poses For Asthma Patients : फटाक्यांच्या धुराने जीव गुदमरतोय? दमा असलेल्या व्यक्तींसाठी 2 रामबाण योगासने

Asthma Patient Yoga Poses : हवा दूषित झाल्याने दमा तसेच श्वसनाच्या अनेक समस्या असलेल्या नागरिकांना श्वास घेणे कठीण झाले आहे. व्यवस्थित श्वास घेता येत नसल्याने अशा व्यक्तींचा जीव गुदमरत आहे.
Asthma Patient Yoga Poses
Yoga Poses For Asthma PatientsSaam TV
Published On

सर्वत्र दिवाळीचा उत्सव साजरा केला जात आहे. भारतात दिवाळी म्हटलं की फटाक्यांची आतिषबाजी होते. बाजारात सध्या विविध पद्धतीचे फटाके आले आहेत. जल्लोष साजरा करण्यासाठी अनेक व्यक्ती फटाके फोडत आहेत. मात्र फटाक्यांमध्ये असलेल्या रासायनिक धुरामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. हवा दूषित झाल्याने दमा तसेच श्वसनाच्या अनेक समस्या असलेल्या नागरिकांना श्वास घेणे कठीण झाले आहे. व्यवस्थित श्वास घेता येत नसल्याने अशा व्यक्तींचा जीव गुदमरत आहे.

Asthma Patient Yoga Poses
Yoga Tips For Strong Memory : मुलांनी कितीही वाचलं तरी उत्तरं लक्षात राहत नाहीत? ही आसने करताच वाढेल स्मरणशक्ती

तुम्हाला देखील हा त्रास होत असेल किंवा तुमच्या आसपासच्या परिसरातील काही व्यक्तींना दमा अथवा श्वासनाच्या समस्या असतील तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. कारण आज आम्ही तुम्हाला या माहितीमधून दोन योगासने सांगणार आहोत. ही दोन्ही योगासने दमा असलेल्या व्यक्तींसाठी फायदेशीर आहेत. चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

भस्त्रिका का प्राणायाम

भस्त्रिका प्राणायाम श्वसनाचा एक योगा आहे. हे प्राणायाम केल्याने तुम्हाला श्वास घेण्यास कोणतीही अडचण येणार नाही. सकाळी उठल्यानंतर मोकळ्या हवेमध्ये हा प्राणायाम करावा. भस्त्रिका प्राणायाम करणे अगदी सोपे आहे. त्यासाठी शरीराच्या जास्त मेहनतीची गरज नाही. लहानांपासून वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वजण हे प्राणायाम करू शकतात.

भस्त्रिका प्राणायाम करताना सर्वात आधी पायाची मांडी घालून खाली बसावे. पाठीचा कणा ताठ ठेवावा. आपले दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवावेत. पुढे दीर्घ श्वास घ्यावा. ज्या वेगात तुम्ही दीर्घ श्वास घेत आहात त्याच वेगात श्वास पुन्हा सोडावा. याचे एकूण पाच सेट करावेत. सावकाश, मध्यम आणि वेगात अशा तीन पद्धतीमध्ये भस्त्रिका प्राणायाम 15 वेळा करावे.

हे प्राणायाम केल्याने हार्ट पेशंटला देखील फायदा होतो. याने श्वसनाची हवा थेट हृदयापर्यंत पोहोचते. शरीरातील मेंदू, पोट, यकृत अशा विविध अवयवांपर्यंत श्वास पोहोचतो. प्रदूषणाच्या काळात श्वास घेण्यास अडचण होत असेल तर हे योगासन नक्की करावे.

अनुलोम-विलोम प्राणायाम

अनुलोम-विलोम प्राणायाम सुद्धा श्वसन सुरळीत करण्यास मदत करते. हे आसन करताना तुम्हाला एक नाकपुडी हाताच्या बोटाने बंद करायची आहे. तसेच दुसऱ्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा त्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. हे तुम्हाला सकाळी ५ वेळा करायचे आहे. ही दोन योगासने केल्याने तुमच्या श्वासावर नियंत्रण राहिल.

Asthma Patient Yoga Poses
Rihanna Poses With Paparazzi: “हॉलिवूडची असली तरीही ‘डाऊन टू अर्थ’ आहे...”; रिहानाच्या एका कृतीने भारतीय चाहते भारावले

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com