World Vegetarian Day: नॉनव्हेजपेक्षा व्हेज खाणाऱ्यांची संख्या जास्त; जगभरात का वाढलेत शाकाहारी?

Vegetarian Day: जगभरात शाहाकारी जेवणाला सर्वाधिक पसंती; कारण काय?
World Vegetarian Day
World Vegetarian DaySaam TV
Published On

Vegetarian Day:

जगभरातून शाकाहारी जेवणाला जास्त पसंती मिळताना दिसत आहे. भारतासह परदेशातही मांसाहारापेक्षा शाकाहार करणे व्यक्ती जास्त पसंत करत आहेत. संयुक्त राज्य अमेरिकेतही शाकाहार करणाऱ्यांमध्ये ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच पँडलमध्ये व्हेज रेस्टॉरंटमध्ये वाढ झाली आहे. आतापर्यंत एकूण ९५० व्हेज रेस्टॉरंट सुरू करण्यात आलीयेत. यासह दक्षिण आफ्रिकेतही शाकाहारी व्यक्तींची संख्या वाढत आहे. त्यामुळे व्हेज खाणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढण्यामागचं कारण जाणून घेऊ. (Latest Marathi News)

World Vegetarian Day
Food Poisoning Death: पास्ता पुन्हा गरम करून खाल्ला; २० वर्षीय तरुणाचा मृत्यू; डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक कारण

व्हेज खाणाऱ्यांची संख्या का वाढली?

मांसाहार करणाऱ्या व्यक्ती देखील शाकाहार करत आहेत. व्हेज खाण्याचे आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी बरेच फायदे आहेत. यामुळे तुमच्या बऱ्याच आजारांवर नियंत्रण मिळवता येते. उच्च रक्तदाब, रक्तातील साखर, कर्करोग असे आजार नियंत्रीत राहतात. शिवाय या आजारांवर मातही करता येते.

साल २०२१ च्या वैश्विक सर्वेक्षणात ७४ व्यक्तींनी शाकाहाराला पसंती दाखवली आहे. मांस खाण्यापेक्षा फळ आणि भाज्या खाणे आरोग्यासाठी चांगले असते. याची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी सोशल मीडियावर म्हणजेच सर्व डिजीटल प्लॅटफॉम्सने मदत केली आहे. यावर नागरिकांना भाज्यांचे आरोग्यासाठीचे फायदे सांगण्यात आलेत.

पोषकतत्वे कशात

व्हेज की नॉनव्हेज बेस्ट काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र तुम्ही व्हेज खाता की नॉनव्हेज यापेक्षा तुम्ही प्रोटीनयुक्त कोणते पदार्थ खाता यावर सारं काही अवलंबून आहे. जर तुम्ही व्हेज खात असाल मात्र तुमच्या ताटात प्रोटीन नसलेले सर्व चमचमीत पदार्थ असतील तर त्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

शाकाहार करणाऱ्यांमध्ये भारत सर्वात प्रथम स्थानावर आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर ब्राजील आहे. अमेरिकेतही १८ ते ३४ वयोगटातील ८ टक्के व्यक्ती व्हेज खातात. तर ९.७ मिलियन व्यक्ती शाकाहार पसंत करत असून यातील एक मिलियन व्यक्ती अजिबात मांसाहार करत नाहीत. व्हेज खाण्यासाठी आरोग्यासाठी बरेच फायदे असल्याने व्यक्ती जास्त प्रमाणात शाकाहाराकडे वळले आहेत.

World Vegetarian Day
Healthy Breakfast Food : सकाळच्या नाश्त्यात खा हे 8 सुपरफूड, दिवसभर टिकून राहिल एनर्जी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com