World Thalassemia Day : आनुवंशिक थॅलेसेमियापासून आपल्या मुलांना वाचवा; लग्नाआधी करा हे काम

World Thalassemia Day : थॅलेसेमिया या आजारावर देखील मात करता येते. तुमच्या मुलांना हा आजार होऊनये यासाठी लग्नाआधी तुम्हाला देखील काही महत्वपूर्ण गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे.
World Thalassemia Day
World Thalassemia DaySaam TV

आज ८ मे म्हणजेच जागतिक थॅलेसेमिया दिन आहे. थॅलेसेमिया हा एक आनुवंशिक आजार आहे. या आजाराने अनेक नागरिक त्रस्त आहेत. रक्तातील हिमोग्लोबीन कमी असल्याने हा आजार आणखी बळावत जातो. या आजारापासून आपला बचाव होणं कठीण असल्याचं काही व्यक्ती म्हणतात. मात्र या आजारावर देखील मात करता येते. तुमच्या मुलांना हा आजार होऊनये यासाठी लग्नाआधी तुम्हाला देखील काही महत्वपूर्ण गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे.

World Thalassemia Day
Dance Effect on Health : मनसोक्त नाचा! डान्स करण्याचे आरोग्यासाठी भन्नाट फायदे

इंदौरच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील वैद्यकीय कर्करोगतज्ज्ञ आणि रक्तविकारतज्ज्ञ डॉ. सुनित लोकवाणी यांनी नवभारत टाईम्स या माध्यम संस्थेला दिलेल्या मुलाखतीत थॅलेसेमिया बद्दल माहिती दिली आहे. थॅलेसेमिया हा आजार बरा होत नाही, असा फक्त नागरिकांमध्ये एक गैरसमज आहे. हा आजार पूर्णता नष्ट देखील करता येतो, असा दावा डॉक्टरांनी केला आहे.

लग्नाआधी हे काम करा

ज्या व्यक्तीशी तुम्ही विवाह करणार आहात त्या व्यक्तीची आणि तुमची हीमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस टेस्ट करून घ्या. या टेस्टनंतर तुमच्या दोघांचे रिपोर्ट एकमेकांना मॅच करत असतील तर तुम्हाला होणाऱ्या बाळाला देखील या आजाराची लागण होईल. त्यामुळे तुम्हाला हा आजार असल्यास पार्टनरला तो नसावा. थॅलेसेमिया असलेल्या व्यक्तींनी बाळासाठी प्लानिंग करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

थॅलेसेमिया आजार म्हणजे काय?

थॅलेसेमिया हा एक आनुवंशिक आजार आहे. थॅलेसेमिया असलेल्या व्यक्तींच्या रक्तात याचे विषाणू असतात. त्यामुळे आई-वडिलांना थॅलेसेमिया असल्यास मुलांना देखील होतो. यामुळे तुमच्या शरिरात आवश्यक तेवढं हिमोग्लोबिन बनवण्याची क्षमता नसते. थॅलेसेमिया असलेल्या व्यक्तीच्या शरिरात लाल रक्त पेशी कमी असतात. लाल रक्त पेशींमधून ऑक्सिजन वाहून नेला जातो. त्यामुळे थॅलेसेमिया ग्रस्त व्यक्ती कायम अशक्त असतात.

थॅलेसेमियाची लक्षणे

थकवा जाणवणे

अवयवांची योग्य वाढ न होणे

श्वास घेण्यास त्रास होणे

त्वचा पिवळी पडणे

टीप: ही सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचा दावा करत नाही.

World Thalassemia Day
Health Tips: जमिनीवर बसून जेवण करण्याचे फायदे माहिती आहेत का?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com