Dance Effect on Health : मनसोक्त नाचा! डान्स करण्याचे आरोग्यासाठी भन्नाट फायदे

Dance Beneficial for Mental Health : डान्स केरताना आपण विविध स्टेप्स तसेच गाण्याचे बोल यातून एखादा प्रसंग, प्रेम, मैत्री, द्वेश असे विविध भाव देखील दाखवतो. त्यामुळे डान्स केल्याने आपल्या मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होतो
Dance Effect on Health
Dance Effect on HealthSaam TV

हळद, लग्न किंवा आनंदाच्या कोणत्याही क्षणी आपण नाचून आपला आनंद साजरा करत असतो. तुम्ही देखील अशा पद्धतीने आनंद साजरा करत असाल. डान्सचे विविध प्रकार देखील आहे. कथक, भरतनाट्यम, वेस्टर्न, लावणी, भांगडा असे विविध राज्यातील विविध प्रकारचे डान्स आहेत.

Dance Effect on Health
Health Tips: जमिनीवर बसून जेवण करण्याचे फायदे माहिती आहेत का?

नृत्य आणि डान्समधून आपण आपली संस्कृती देखील समोर प्रेजेंट करत असतो. डान्स करताना आपण विविध स्टेप्स तसेच गाण्याचे बोल यातून एखादा प्रसंग, प्रेम, मैत्री, द्वेश असे विविध भाव देखील दाखवतो. त्यामुळे डान्स केल्याने आपल्या मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होतो हे तुम्हाला माहिती आहे का?

तणाव दूर होतो

धकाधकीच्या जीवनात आपण प्रवास करताना कायम मनोरंजन आणि विरंगुळा म्हणून गाणी ऐकत असतो. गाणी ऐकताना त्यातील स्टेप्सप्रमाणे आपले पाय देखील थिरकतात. त्यामुळे प्रवासात येणारा मानसिक ताण पूर्णता नाही मात्र थोड्यावेळासाठी कमी होतो.

मूड फ्रेश राहतो

डान्स केल्याने आपला मूड फ्रेश राहतो. डान्स केल्यामुळे आपल्या शरिरात एंडोर्फिन हार्मोन्स जागे होतात. त्याने चिंता दूर होते आणि आपला मूड प्रत्येकवेळी फ्रेश राहतो. मूड फ्रेश असल्याने सहाजीकच आपलं कामात मन लागतं आणि संपूर्ण दिवस चांगला जातो.

मन हलकं होतं

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या कारणामुळे दु:ख आणि निराशा असते. ऑफिसमध्ये बॉस, घरी कुटुंबीय या सर्वांसोबत वाद होत असल्यास त्या व्यक्तीला आपलं मन मोकळं करता येत नाही. त्यासाठी तुम्ही आवडीच्या गाण्याचा वापर करू शकता. आवडीच्या गाण्यावर तुम्ही मनमोकळेपणाने डान्स करू शकता.

आत्मविश्वास वाढतो

डान्स करताना आपण आपल्यात असलेली कला, आपल्यातील हुनर प्रेझेंट करत असतो. त्यामुळे चार माणसांत नृत्य केल्यास त्यांच्याकडून आपल्यावर कौतुकाची थाप पडते. त्याने आत्मविश्वास आणखी बळावतो.

Dance Effect on Health
Sharad Pawar Health News: एक दिवसाच्या ब्रेकनंतर शरद पवार पुन्हा एकदा झंजावाती दौऱ्यासाठी सज्ज! मोठी Update समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com