मुंबई : राजस्थानमधील 'विश्वास स्वरूपम'ला लवकरच दोन वर्ष पूर्ण होणार आहे. या 'विश्वास स्वरूपम'ला आतापर्यंत १५ लाखांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे. या वास्तूला 'स्टॅच्यू ऑफ बिलीफ' म्हणूनही ओळखलं जात आहे. भगवान शंकराची ही मूर्ती ३६९ फूट उंच आहे. ही मूर्ती देशभरातील पर्यटकांनी आकर्षित करत आहेत.
भगवान शंकराची मूर्ती जगातील सर्वात मोठ्या मूर्तीपैकी एक आहे. ३२ एकरांवर ही मूर्ती पसरलेली आहे. तसेच याची उंची ११२ मीटर आहे. तसेच निर्मिती २.५ लाख घन टन क्राँकीटपासून तयार करण्यात आली आहे.
राजस्थानमधील या मूर्तीचं आयुष्य २५० वर्षे आहे. २५० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना तोंड देण्यासाठीही भगवान शंकराची मूर्ती सज्ज आहे. तसेच भूकंपाच्या झोन आयव्हीमध्येही स्थिर राहण्यासाठी डिझाइन केलेले आहे. या मूर्तीमध्ये २७० फूट आणि २८० फूट उंचीवर गॅलरी असून त्या काचेच्या पायवाटेने जोडलेल्या आहेत.
पर्यटक हा ३५१ फूट उंचीवर जाऊन जलाभिषेक किंवा चरणवंदन करू शकतो. पर्यटकांसाठी या परिसरात स्नो पार्क, वॅक्स म्युझियम आणि गेम झोन देखील आहे. काही दिवसांपूर्वी उत्साहात भर घालण्यासाठी येथे २० फूट उंचीवर एक नवीन अनोखा ३डी अनुभव 'आत्ममंथन' लाँच करण्यात आलाय. या आत्ममंथनमध्ये १७ वेगवेगळ्या गॅलरी आहेत. या गॅलरी निसर्गाच्या घटकांना प्रेरित आहेत.
काही गॅलरीमध्ये ५ तत्वे हवा, पाणी, अग्नी, आकाश आणि विश्वविज्ञान यांना प्रेरित आहेत. काही गॅलरी समुद्रमंथन आणि कल्पतरू वृक्ष या गॅलरी देखील आहेत. 'क्रिस्टल टेरेन', 'द कायनेसिस ऑफ बिलीफ' आणि 'ओम बेल' सारख्या गॅलरी देखील आहेत. 'कैलास मानसरोवर' आणि 'टनेल टू इटरनिटी' सारख्या गॅलरीही आहेत. या गॅलरीमधून आत्मनिरीक्षण आणि ज्ञानाची प्रेरणा मिळते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.