World Polio Day 2023 : ही लक्षणे दिसल्यास असू शकतो पोलिओचा आजार, कोणत्या वयातील मुलांना सर्वाधिक धोका?

Polio Symptoms Prevention : पोलिओ हा आजार विषाणूमुळे होतो. २४ ऑक्टोबरला जगभरात पोलिओ निमुर्लन दिन साजरा केला जातो.
World Polio Day 2023
World Polio Day 2023Saam Tv
Published On

Polio Symptoms :

पोलिओ हा आजार विषाणूमुळे होतो. २४ ऑक्टोबरला जगभरात पोलिओ निमुर्लन दिन साजरा केला जातो. याला पोलियोमायलिटिस हा लहान मुलांमध्ये वेगाने पसरणारा आणि अपंगत्व आणणारा संसर्गजन्य आजार आहे.

पोलिओचा आजार रोखण्यासाठी सर्वात मोठा मार्ग म्हणजे लसीकरण. हा आजार लहान मुलांमध्ये कसा होतो? कोणत्या वयातील मुलांना सर्वाधिक धोका आहे. याविषयी जाणून घेऊया ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिओचा (Polio) विषाणू नाकातून किंवा तोंडातून तुमच्या शरीरात प्रवेश करु शकतो. यानंतर पोटातील आतड्यांमध्ये तो हळूहळू पसरतो. ज्यामुळे मेंदू आणि पाठीच्या कण्यावर त्याचा परिणाम होताना दिसतो. ज्यामुळे हात, पाय किंवा श्वसनावर परिणाम होऊन अपंगत्व येते.

हा आजार (Disease) ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना होतो. त्यामुळे या आजाराबाबत जनजागृती करणे अधिक महत्त्वाचे आहे. हा आजार संसर्गजन्य असून एका व्यक्तीमार्फत दुसऱ्या व्यक्तीमध्ये सहज पसरला जातो.

World Polio Day 2023
Most Dangerous Fort In Pune : डोळ्यांना स्वर्गसुख देणारा पुण्यातील चित्तथरारक किल्ला, निसर्गाचं सौंदर्य पाहून ट्रेकर्सप्रेमींना भूरळ!

1. पोलिओची लक्षणे कोणती?

  • घसा खवखवणे

  • ताप

  • डोकेदुखी (Headache)- पोटदुखी

  • अतिसार- उलट्या

  • थकवा

  • मान (Neck) आणि पाठीचा भाग कडक होणे

  • स्नायू दुखणे

2. या आजारावर प्रतिबंधाची पद्धत

पोलिओपासून बचाव करण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे पोलिओची लस. ही लस पाच वर्षांखालील मुलांना दिली जाते. तोंडावाटे पोलिओचे काही थेंब मुलांना देण्यात येतात.

या आजाराची लक्षणे संसर्गानंतर ३ ते २१ दिवसांत दिसू लागतात. काही वेळेस या आजाराची लक्षणे दिसत नाही परंतु, ताप , थकवा आणि अशक्तपणा, डोकेदुखी, मळमळ आणि स्नायू कडक होणे यांसारखे आजार दिसून येतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com