Most Expensive Colour : जगातील सर्वात महागडा रंग; सोन्या-चांदीच्या किंमतीहून महाग

Most Expensive Colour : देशभरात होळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. देशभरात होळीनिमित्त बाजारात वर्दळ पाहायला मिळत आहे. बाजारात लहानग्यांपासून प्रौढांनी रंग खरेदीसाठी एकच गर्दी केली आहे.
Most Expensive Colour
Most Expensive Colour Saam tv
Published On

Most Expensive Colour News :

देशभरात होळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. देशभरात होळीनिमित्त बाजारात वर्दळ पाहायला मिळत आहे. बाजारात लहानग्यांपासून प्रौढांनी रंग खरेदीसाठी एकच गर्दी केली आहे. जगात असाही एक रंग आहे, त्याची किंमत सोने-चांदीहून महाग आहे. हा रंग खरेदी करताना श्रीमंत लोकही अनेकदा विचार करतील. या रंग आणि त्याच्या किंमतीविषयी माहिती जाणून घेऊयात. (Latest Marathi News)

तुम्ही या महागड्या रंगाविषयी गुगल करून देखील माहिती मिळवू शकता. जगात निळा हिरा महाग असून ३२ मिलियन डॉलरपर्यंत त्याची विक्री झाली आहे. लाल हिऱ्यापेक्षा महागडा हा हिरा आहे. तर जगात लापीस लाझुली हा रंग सर्वात महागडा रंग आहे. कलर मॅटर्सच्या रिपोर्टनुसार, लापीस लाझुली रंग हा दुर्मिळ आणि महागडा रंग आहे. प्राचीन काळातील प्रसिद्ध चित्रकार चित्रामध्ये या रंगाचा वापर करायचे.

Most Expensive Colour
Holi 2024 : होळीचे रंग आणि पाण्यापासून मोबाईलचे संरक्षण कसे करावे? फॉलो करा 'या' टिप्स

रंग इतका महागडा का?

तु्म्ही विचार करत असाल की, लापीस लाझुली रंग इतका महाग का? लापीस लाझुलीला दळून हा रंग तयार केला जातो. खरंतर लापीस लाझुली हे अफगाणिस्तानात आढळणारे रत्न आहे. राजघराण्यातील विशेष समारंभात वापर करण्यासाठी या रंगाची निर्मिती केली जाते. काही वर्षांपूर्वी रत्नाला दळण्याची प्रक्रिया खूप अवघड होती. यामुळे या रंगाचा वापर कमी व्हायचा.

निळ्या रंगाचं रत्न

रिपोर्टनुसार, लापीस लाझुली खरंतर निळ्या रंगाचं रत्न आहे. अफगाणिस्तानील डोंगरात हे रत्न आढळतं. प्राचीन भारतीय संस्कृतीत या रत्नाला नवरत्न म्हणून मान्यता मिळाली होती. या रत्नाला आधी लाजवर्त या नावाने ओळखलं जायचं. या रंगाच्या एका ग्रॅमची किंमत ८३ हजार रुपये आहे. शास्त्रात या रत्नाला खूप महत्व आहे. रत्न शास्त्रानुसार, कुंडलीमध्ये शनि असल्यास दोष कमी करण्यासाठी लाजवर्त रत्न घालण्याचा सल्ला दिला जातो.

Most Expensive Colour
Holi Celebration : रंगिबेरंगी रंगांनी सजली बाजारपेठ; महाराष्ट्रात ठिकठिकाणी उत्साहात होळी साजरी

टीप : या लेखातील काही माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com