World Mental Health Day : मन शांत ठेवण्यासाठी आणि झोपेची समस्या दूर करण्यासाठी ही योगासने ठरतील बेस्ट!

Yoga For Mental Health : आजकाल अनेकजण शारीरिक आरोग्याव्यतिरिक्त, मानसिक आरोग्याच्या समस्यांशी देखील झुंजत आहेत.
World Mental Health Day
World Mental Health Day Saam Tv
Published On

Yoga Tips :

सध्याच्या धावपळीच्या जीवनात स्वत:ला तंदुरुस्त ठेवणे प्रत्येकासाठी आव्हान बनले आहे. 10 ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य म्हणून जगभरात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश शारीरिक दृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या निरोगी, तंदुरुस्त आणि आनंदी जीवन जगू शकता.

आजकाल अनेकजण शारीरिक आरोग्याव्यतिरिक्त, मानसिक आरोग्याच्या समस्यांशी देखील झुंजत आहेत. तुम्हाला या समस्येला सामोरे जाण्यासाठी दैनंदिन जीवनात योगाचा (Yoga) समावेश करणे आवश्यक आहे. मनाला शांत आणि निरोगी Healthy ठेवण्याचे अनेक मार्ग असले तरी योगासने यात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. दररोज फक्त 15-20 मिनिटे केल्याने, आपण आपल्या शरीरासह आपले मन रिचार्ज करता येते.

Bhujangasana Benefits
Bhujangasana BenefitsSaam Tv

भुजंगासन

भुजंगासन हे असे आसन आहे जे शरीराला अनेक प्रकारे फायदेशीर (Benefits) ठरते. हे आसन पोटाची चरबी कमी करण्यासाठी, पाठदुखी कमी करण्यासाठी आणि मानसिक शांती देण्यासाठी खूप प्रभावी आहे.

  • भुजंगासन करण्यासाठी, योगा चटईवर पोटावर झोपा.

  • दोन्ही हात छातीच्या पातळीवर जमिनीवर ठेवा.

  • आता श्वास घेताना दोन्ही हातांवर भार टाकून शरीर वर करा आणि डोके मागे हलवा.

  • कमरेखालील भाग जमिनीला स्पर्श करणारा असावा.

  • हे आसन 20 ते 30 सेकंद धरून ठेवा.

Bridge Pose
Bridge PoseSaam Tv

ब्रिज पोज

ब्रिज पोज म्हणजेच सेतुबंधासन. या आसनाचा सराव केल्याने शरीरच नाही तर मनही तंदुरुस्त राहते. सकाळी थोडा वेळ हे करा आणि मग पाहा दिवसभर तुम्ही कसे चार्ज होतात.

  • सेतुबंधासन करण्यासाठी पाठीवर झोपा.आता गुडघे वाकवून कंबर आणि नितंबाचा भाग जमिनीपासून वर उचला.

  • या स्थितीत असताना, 15 ते 20 वेळा श्वास घ्या आणि बाहेर टाका.

World Mental Health Day
Yoga Mistakes : योगा करताना या चुका करु नका, नाहीतर शरीराला होईल नुकसान
Uttanasana
UttanasanaSaam Tv

उत्तानासन

उत्तानासन करताना संपूर्ण शरीर वरपासून खालपर्यंत चांगले ताणले जाते. जे केवळ स्नायूंचाच नाही तर मनाचा ताणही दूर करते. त्यामुळे तुमचे मन निरोगी ठेवण्यासाठी तुम्हीही या आसनाची मदत घेऊ शकता.

  • उत्तानासन करण्यासाठी चटईवर सरळ उभे रहा.

  • दीर्घ श्वास घेऊन दोन्ही हात वर करा.

  • हळूहळू श्वास सोडताना कमरेपासून शरीर खाली वाकवा आणि हाताने बोटांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.

  • किमान 50 सेकंद या आसनात राहण्याचा प्रयत्न करा.

Janu shirshasan
Janu shirshasanSaam Tv

जानुशीर्षासन

जानुशीर्षासन केल्याने मन शांत राहते. याशिवाय हे आसन नैराश्य, थकवा, चिंता, डोकेदुखी आणि निद्रानाश या लक्षणांपासूनही आराम देते.

  • यासाठी चटईवर दोन्ही पाय समोर ठेवून बसा.

  • आता तुमचा उजवा पाय वाकवून डाव्या पायाच्या मांडीजवळ ठेवा आणि श्वास घेऊन दोन्ही हात वरच्या दिशेने सरळ करा.

  • श्वास सोडताना शरीराला पुढे वाकवून डाव्या पायाची बोटे धरण्याचा प्रयत्न करा. या स्थितीत डोके डाव्या पायाच्या गुडघ्यावर ठेवावे लागते.

  • या आसनात असताना 5 ते 10 वेळा श्वास घ्या आणि सोडा.

World Mental Health Day
Facial Yoga : चेहऱ्यावरील लाँग लास्टिंग ग्लोसाठी फायदेशीर ठरतील ही योगासने! आजच अवलंब करा
Pranayama
PranayamaSaam Tv

ध्यान आणि प्राणायाम

ध्यान आणि प्राणायाम देखील खूप महत्वाचे आहेत. योग करताना आपण आपला श्वास रोखून धरला पाहिजे आणि त्या दरम्यान शरीराच्या 7 प्रमुख बिंदूंवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. दररोज ध्यान आणि प्राणायाम करणे खूप महत्वाचे आहे. प्राणायाम केल्याने आपल्या मेंदूला अतिरिक्त ऑक्सिजन मिळतो, ज्यामुळे आपले मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. तज्ज्ञांच्या मते, अपूर्ण योगासने केल्याने शरीर आणि मनाला पूर्ण लाभ मिळत नाही. त्यामुळे वेळ काढून योगासने करावीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com