World Arthritis Day 2023 : संधिवाताचा उपचाराबाबत रूग्णांना मोजावी लागतेय भली मोठी रक्कम - डाॅक्टरांनी व्यक्त केली चिंता

Arthritis Symptoms : भारतात र्‍हुमॅटॉईड आर्थरायटिस रुग्णांची अंदाजे संख्या सुमारे 36 दशलक्ष रुग्ण आहेत.
World Arthritis Day 2023
World Arthritis Day 2023Saam Tv
Published On

Arthritis Disease :

र्‍हुमॅटॉईड आर्थरायटिस हा एक आँटो इम्यून आजार आहे, जो भारतीय लोकसंख्येच्या 0.3 ते 0.75% लोकांना प्रभावित करतो. तज्ज्ञांनी सादर केलेल्या अहवालानुसार, भारतात र्‍हुमॅटॉईड आर्थरायटिस रुग्णांची अंदाजे संख्या सुमारे 36 दशलक्ष रुग्ण आहेत. योग्य औषधांद्वारे वेळीच उपचार न केल्यास, गंभीर दीर्घकालीन परिणाम आणि सांध्यांमध्ये विकृती निर्माण होऊ शकते.

शिवाय हा रोग फुफ्फुस, हृदयासारख्या अवयवांच्या कार्यावर देखील परिणाम करू शकतो. ऑस्टियोआर्थ्ररायटिस सारख्या संधिवातांच्या इतर प्रकारांच्या तुलनेत र्‍हुमॅटॉईड आर्थरायटिसच्या उपचार पध्दती वेगळ्या असून त्याचा खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नाही.

हा आजार (Disease) कोणत्याही वयोगटावर परिणाम करू शकतो. भारतासारख्या देशात, संधिवाताच्या उपचारांसाठी औषधांची (Medicine) उपलब्धता आणि परवडणारे दर ही एक मोठी समस्या आहे.मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये आणि भारतातही र्‍हुमॅटॉईड आर्थ्ररायटिससाठी किफायतशीर उपचारांची गरज आहे. याव्यतिरिक्त अनेक देशांमध्ये औषधांच्या किंमती अधिक असणे, र्‍हुमॅटॉईड आर्थ्ररायटिसच्या औषधांची उपलब्धता ही आव्हाने अस्तित्वात आहेत त्यामुळे उपचार अधिक आव्हानात्मक ठरतात. या आव्हानांमुळे रूग्ण पारंपारिक आणि नवीन र्‍हुमॅटॉईड आर्थ्ररायटिस थेरपींपासून दूर राहतो.

या आजारात किती खर्च येतो?

इंडियन जर्नल ऑफ रुमॅटोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, वैद्यकीय व्यावसायिकाने शिफारस केलेल्या थेरपीवर अवलंबून आरए उपचारांची एकूण किंमत सर्वसामान्यांना न परवडणारी आहे. पुण्याच्या संचेती हॉस्पीटलचे संधिविकार तज्ज्ञ डॉ निलेश मगर पाटील सांगतात की, थेरपीचा मूळ खर्च विचारात घेतल्यास, रूग्णांचा एकूण मासिक खर्च रु. 6000 ते रु. 18,000 इतका आहे.

World Arthritis Day 2023
Diabetes In Children: चिमुकल्यांमध्ये ही लक्षणे दिसल्यास असू शकतो मधुमेहाचा आजार, दुर्लक्ष करु नका; वेळीच घ्या काळजी

हा खर्च डॉक्टरांनी शिफारस केलेल्या ब्रँडवर अवलंबून आहे. आरए निदान आणि उपचारांचा एक भाग म्हणून, संधिवात (Arthritis) तज्ज्ञ इतर अवयवांवर त्याचे होणारे परिणाम समजून घेण्यासाठी काही चाचण्या आणि तपासण्यांची शिफारस करू शकतात.

औषधांच्या खर्चाव्यतिरिक्त, एकूण उपचार खर्चामध्ये डॉक्टरांचा सल्ला शुल्क, प्रयोगशाळेच्या चाचण्या, वारंवार डोळ्यांची तपासणी आणि अगदी एक्स-रे यांचाही समावेश असतो, याशिवाय लिहून दिलेल्या औषधांच्या खर्चाव्यतिरिक्त, संधिवात असलेल्या 15% रुग्णांसाठी या चाचण्या आवश्यक असतात. शिवाय आरए हा एक जुनाट आजार असल्याने, रुग्ण तसेच त्यांच्या कुटुंबियांना दीर्घकाळासाठी आर्थिक भार सहन करावा लागतो. उपचारांसाठी दर्जेदार औषधे आणि परवडणारी औषधे मिळणे हे देखील आव्हानच ठरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com