Women Fashion Tips : महिलांनो, वयाच्या पन्नाशीनंतर सुंदर दिसायचे आहे ? या 5 फॅशन टिप्स नक्की करा ट्राय !

Fashion Tips : नुकतीच बाजारात आलेली गोष्टी घालणे म्हणजे फॅशन मानली जायची.
Women Fashion Tips
Women Fashion TipsSaam Tv

After 50 Age Women Fashion : सध्याची फॅशन आणि पूर्वीची फॅशन यामध्ये पाहायला गेले तर अगदी जमीन आसमानाचा फरक आहे. पूर्वी नुकतीच बाजारात आलेली गोष्टी घालणे म्हणजे फॅशन मानली जायची. पण सध्याच्या काळात फॅशनची ही व्याख्या पूर्णपणे बदललेली दिसून येते.

हल्ली सुंदर दिसण्यासाठी, चार चौघात उठून दिसण्यासाठी लोकं अनेक वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत असतात. त्यालाच सध्याच्या काळात फॅशन (Fashion) म्हटले जाते. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत जर आपल्याला फिट राहायचे असेल तर फॅशनचे हे ट्रेंड फॉलो करायलाच हवेत असे सर्वांनाच वाटते.

Women Fashion Tips
Career In Fashion Designing : फॅशन सेन्सचे उत्तम नॉलेज आहे ? कसे बनवाल फॅशन डिजाइनिंगमध्ये करिअर? शिक्षणाची अट किती ? जाणून घ्या सविस्तर

पण वाढत्या वयामुळे अनेक महिलांना (Women) फॅशन करणे कठीण होऊन जाते. प्रौढ व्यक्तींना फॅशन करताना अनेक समस्या येतात. आर्प ओआरजीच्या मते, अशा अनेक पद्धती आहेत ज्यांचा वापर करून पन्नाशीतल्या किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या महिला देखील उठावदार फॅशन करू शकतात. काय आहेत त्या पद्धती जाणून घेऊयात.

1. लाल रंगाची लिपस्टिक वापरावी

लाल लिपस्टिक (Lipstick) तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य अधिक खुलवते व बोल्ड लूक देते. त्याचबरोबर तुमचा चेहरा आकर्षक दिसतो. त्यामुळे आजच आपल्या मेकअपमध्ये लाल लिपस्टिकचा समावेश करावा. लाल रंगाची लिपस्टिक वापरताना तो शेड आपल्या चेहऱ्याला सुट होतोय की नाही याची काळजी घ्यावी.

Women Fashion Tips
Fashion Tips For Women : पुन्हा आली कार्गो पॅन्टची फॅशन, दिसाल कूल ट्राय करा समर लूक !

2. स्टायलिश व मोठे नेकलेस वापरावेत

तुम्ही अनेकदा पार्टीत सेलिब्रिटींनी मोठे नेकलेस घातलेले पाहिले असेल. यामागचे लॉजिक म्हणजे या गोष्टी आकर्षित करतात. त्यामुळे जर तुम्हाला देखील चार चौघात उठून दिसायचे असेल तर तुमच्याकडे मोठे व आकर्षक नेकलेस असणे आवश्यक आहे. नेकलेस ऐवजी तुम्ही 2-3 हलक्या चैनी देखील वापरू शकता.

3. काळ्या रंगाऐवजी पांढऱ्या रंगाच्या पँटींचा वापर करावा

काळ्या रंगाची पँट ही फॅशन आता जुनी झाली आहे, जर तुम्हाला गर्दीत उठून दिसायचे असेल तर तुम्ही काळ्या पँटीऐवजी पांढऱ्या रंगाची पँट वापरू शकता. तुम्ही फॅशनेबल लूकसाठी व्हाईट जीन्स किंवा बॅगी जीन्सचा वापरू शकता. तुम्ही तुमच्या नव्या लूक मध्ये काळ्या रंगाच्या टॉपसह पांढऱ्या रंगाची पँट आणि शूज घालून आपला फॅशनेबल लूक पूर्ण करू शकता.

Women Fashion Tips
Summer Fashion With Trousers | समर सीजनमध्ये ट्रेंडी ट्राउझर्स घाला, मिळवा गॉर्जियस लुक

4. जीन्सना एक्सेसराइज करणे

आज पासून काही वर्षेआधी पाहायला गेले तर घट्ट जीन्सची क्रेज फार होती. परंतु आता तीच फॅशन काळाआड जाऊन मोठ्या व लूज जीन्सना अधिक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे जर सध्याच्या फॅशन ट्रेंडमध्ये टिकून राहायचे असेल तर तुम्ही आपल्या सेटमध्ये लूज जीन्सना अॅड करू शकता. या जीन्स तुम्हाला स्टायलिश लुक देतील.

5. स्टायलिश शूज आणि सँडलचा वापर करावा

आपले फूट वेअर आपल्या संपूर्ण फॅशनला पूर्ण करणारं असतं. फूट वेअरमुळे तुमचा एकुणच लूक पूर्ण होतो. जर तुम्हाला सध्याची फॅशन फॉलो करायची असेल तर सध्याचे ट्रेंडी शूज तुमच्या सेटमध्ये असायलाच हवेत. जशी लाल लिपस्टिक तुमच्या चेहऱ्याचे आकर्षण वाढवते अगदी त्याचप्रकारे लाल शूज देखील तुमचा संपूर्ण लूक आकर्षक करतात. तेव्हा तुमच्याकडे ते असणे आवश्यक आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com