How to identify cervical cancer : जगभरातील ८० टक्के महिला या गर्भाशयाच्या कर्करोगांने ग्रस्त आहे. सतत बिघडत चालेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हा आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बरेचदा महिला आपलं काही दुखणे अंगावर काढतात. त्यामुळे त्यांना अनेक मोठ्या आजारांना सामोरे जावे लागते.
या आजारावर वेळीच उपचार न केल्यास जीव देखील जाण्याची अधिक शक्यता असते. जाणून घेऊयात या आजाराची लक्षणे
गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका अनेक महिलांना असतो. अशा परिस्थितीत या आजारांबद्दल जागरुक राहाणे महत्त्वाचे आहे. या आजारात सुरुवातीची लक्षणे लवकर दिसून येत नाहीत. काही वेळेस दुखणे हे सामान्य आजारासारखे असते. परंतु आपण वेळीच लक्ष दिल्यास या आजारांवर मात करता येते.
बद्धकोष्ठतेचा त्रास
अपचन होणे
सतत थकवा येणे
छातीत जळजळ होणे
पाठदुखी
सतत लघवी होणे
ओटीपोटात वेदना
वजन कमी होणे
पोट फुगणे किंवा सुजणे
2. कशी घ्याल काळजी ?
वरील पैकी कोणतीही लक्षणे तुम्हाला दिसल्यास तुम्ही त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. ज्यामुळे या आजारावर वेळीच मात करता येईल. तसेच खाण्यापिण्यात बदल करायला हवा. कोणतेही दुखणे अंगावर काढू नये.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.