Tea Benefits: गुलाबी थंडीत आल्याचा गरमागरम चहा पिण्याचे 'हे' आहेत आश्चर्यकारक फायदे

Ginger Tea Benefits: हिवाळ्याला आता सुरुवात झालीये. या दिवसांमध्ये कड्याक्याची थंडी सुरू असते.
Ginger Tea Benefits
Tea BenefitsYANDEX
Published On

हिवाळ्याला आता सुरुवात झालीये. या दिवसांमध्ये कड्याक्याची थंडी सुरू असते. कोणालाच सकाळी लवकर उठायची इच्छा होत नाही. या थंडीच्या वातावरणात जर उठल्या उठल्या कडक चहा मिळाला तर... त्याहून सुंदर दिवस नाही. गुलाबी थंडीत चहा प्रेमींचे चहाचे कप तुमच्या किचनवर नेहमी पेक्षा जास्तच दिसत असतात. आणि त्यात जर आलं असेल तर अती उत्तम. चहात आले खातल्याने आपल्याला फ्रेश वाटतेच पण त्यासोबत थंडीत शरीराला आवश्यक असणारे घटक सुद्धा मिळतात. चला तर चहा पिण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊ.

थंडीच्या दिवसात आल्याचा गरम चहा प्यायल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. खाली या चहाचे १० महत्त्वाचे फायदे दिले आहेत:

उष्णता: चहा थंड हवामानात शरीराला उष्णता देऊन शरीरातील थंडी कमी करतो.

प्रतिकारशक्ती वाढवतो: आल्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.

सर्दी-खोकल्यावर गुणकारी: आले हे सर्दी, खोकला आणि घशातील खवखव यावर प्रभावी उपाय आहे.

पचन सुधारतो: आले पचनक्रिया सुधारून गॅस आणि अपचनाची समस्या कमी करते.

डोकेदुखीसाठी उपयोगी: आल्याचा गरम चहा डोकेदुखी आणि तणाव कमी करण्यास मदत करतो.

Ginger Tea Benefits
Thyroid Eye Disease: आरोग्यासोबतच थायरॉईडचा डोळ्यांवरही होतोय वाईट परिणाम? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

रक्ताभिसरण सुधारतो: आले रक्ताभिसरण सुधारून थंडीमुळे होणारा रक्तवाहिन्यांचा अडथळा कमी करतो.

सांधेदुखी कमी करते: आलेतील अँटी-इन्फ्लेमेटरी गुण सांधेदुखी आणि स्नायूंच्या वेदना कमी करतात.

त्वचेसाठी फायदेशीर: आले रक्त शुद्ध करून त्वचेला तजेलदार बनवते.

मळमळ थांबवते: आले मळमळ आणि उलट्या थांबवण्यास मदत करते.

मूड सुधारतो: आल्याचा सुगंध आणि चव मन प्रसन्न करतो.

आल्याचा चहा करण्याची योग्य पद्धत

1. पाण्याला उकळी आणा.

2. त्यात अर्धा इंच आले किसून टाका.

3. उकळी आल्यानंतर २-३ मिनिटे चहा मुरू द्या.

4. चहा गाळून त्यात मध किंवा साखर घाला.

5. गरमागरम चहा सर्व्ह करा.

आल्याचा चहा नियमित प्यायल्याने थंडीत आरोग्य टिकवण्यासाठी मदत होते!

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Written By: Sakshi Jadhav

Ginger Tea Benefits
Relationship Tips: ब्रेकअपनंतर तुमचा जोडीदार परत येईल का? या चिन्हांद्वारे समजून घ्या

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com