Winter Lips Care : हिवाळ्यात तुमचे ओठ सतत सुकताय ? 'हे' घरगुती उपाय करुन पहा

जसजसा हिवाळा जवळ येत आहे, तसतशी प्रत्येकाला भेडसावणारी सर्वात सामान्य समस्या म्हणजे कोरडे ओठ.
Winter Lips Care
Winter Lips CareSaam Tv

Winter Lips Care : हिवाळा सुरु झाला की, आपल्याला त्वचेच्या अधिक समस्यांचा सामना करावा लागतो. चेहरा फुटणे, कोरडा पडणे किंवा ओठ सतत सुकणे यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.

जसजसा हिवाळा जवळ येत आहे, तसतशी प्रत्येकाला भेडसावणारी सर्वात सामान्य समस्या म्हणजे कोरडे ओठ. डिहायड्रेशनपासून जीवनसत्त्वांच्या कमतरतेपर्यंत अनेक आरोग्य समस्यांमुळे ओठ आपले फाटतात. आपल्या ओठांना हायड्रेट करणे आणि कोरडेपणा दूर करणे अशक्य नाही. ओठांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी काही घरगुती उपायांचा अवलंब केल्यास या त्रासातून मुक्त होऊ शकतात. (Latest Marathi News)

Winter Lips Care
Winter Foot Care : फाटलेल्या टाचा हिवाळ्यात अधिक त्रास देताय ? फक्त 'हे' करुन पहा, मिळेल आराम

1. कोरफड

Aloe Vera
Aloe Vera Canva

कोरफड ही औषधी वनस्पती दाहक-विरोधी गुणधर्मांसाठी ओळखली जाते. फाटलेल्या ओठांसारख्या त्वचेच्या समस्येवर ही प्रभावी ठरते. इंडियन जर्नल ऑफ डर्मेटोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, कोरफडमध्ये पॉलिसेकेराइड्स आणि ग्रोथ हार्मोन्स असतात जे जखमा लवकर बरे होण्यास मदत करतात. शिवाय, त्यात जीवनसत्त्वे (Vitamins) ए आणि सी असते. जे पर्यावरणातील विषारी पदार्थांमुळे होणारे नुकसान तटस्थ करण्यात मदत करतात. कोरफडीचा जेल दिवसातून किमान 2-3 वेळा ओठांवर लावल्यास फायदा होऊ शकतो.

2. मध

Honey
HoneyCanva

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीनच्या अभ्यासानुसार, मधामध्ये अँटीमाइक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. जे आपल्या ओठांना क्रॅक होण्यापासून आणि संसर्गापासून वाचवू शकतात. त्यात प्रतिजैविक गुणधर्म देखील आहेत आणि एक एक्सफोलिएटिंग एजंट म्हणून कार्य करते जे मृत त्वचेच्या पेशी नष्ट करण्यात मदत करते. याचा वापर आपण ओठांवर थोडे मध लावून 20-30 मिनिटे असे ठेवायला हवे. गोलाकार हालचालींमध्ये ओठांना मसाज करा आणि नंतर ते स्वच्छ करा.

Winter Lips Care
Winter Health Tips : हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास होतोय ? 'या' टिप्स फॉलो करा

3. तूप

Ghee
GheeCanva

अभ्यासातून असे दिसून आले आहे की तुपात काही आम्ल असतात जे कोरड्या ओठांसाठी फायदेशीर ठरू शकतात. हे आपल्या ओठांच्या त्वचेला ओलावा देते आणि त्यांना मऊ बनवते. हे अनेक पोषक तत्वांनी देखील समृद्ध आहे, जे तुमच्या ओठांना हायड्रेट ठेवते. आपल्या बोटांचा वापर करून, थेट ओठांवर तूप लावा. ते लागू केल्यानंतर, ते काढण्यापूर्वी 15-20 मिनिटे राहू द्या. दिवसातून एकदा तरी हे करा.

4. खोबरेल तेल

Coconut Oil
Coconut OilCanva

ओठांची त्वचा पातळ असल्यामुळे ओलावा सहज गमावतो. नारळाचे तेल (Oil) त्याच्या मॉइश्चरायझिंग प्रभावामुळे कोरडेपणासाठी सर्वोत्तम उपायांपैकी एक आहे. हे इमोलियंट म्हणून देखील ओळखले जाते, याचा अर्थ आपली त्वचा ओलसर राहील. त्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि जंतुनाशक गुणधर्म आहेत जे संसर्ग टाळू शकतात. कॉटन पॅडच्या मदतीने ओठांवर खोबरेल तेल लावा. 1 मिनिट ओठांना मसाज करा. तुम्ही हे रात्री देखील करू शकता आणि रात्रभर तसेच ठेवू देखील शकतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com